दादर येथील कबुतरखान्यावरून सुरू असलेल्या वादात आता शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी उडी घेतली आहे. कबुतरांना दाणे टाकण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी जैन समाजावर जोरदार टीका केली आहे. जैन समाजाने केलेले आंदोलन हा “टोकाचा आणि अतिरेकी विचार” असल्या
.
मनिषा कायंदे म्हणाल्या की, हा सगळा विषय न्यायप्रविष्ट आहे.आजचे आंदोलन म्हणजे अतिरेकी टोकाचा विचार केला जात आहे. न्यायप्रविष्ठ विषय असताना असे वागणं कोणत्या कायद्यात बसते. काल मुख्यमंत्र्यांना त्यांनी धर्म संकटात टाकले आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि निर्णय दिला. परंतू मुळात याची सुनावणी सुरू आहे.
अन् तिथे कबुतरखाने तयार केले
मनीषा कायंदे यांनी कबुतरांना दाणे टाकण्याच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कबुतरखान्याचा विषय न्यायप्रविष्ट असताना कोणीही उठून दाणे टाकायला सुरुवात करतात. रस्त्यांवरील फुटपाथ लोकांना चालण्यासाठी आहेत, दाणे टाकण्यासाठी नाहीत, असे त्यांनी म्हटले. मुंबईतील 51 ठिकाणी कबुतर खाने कसे सुरू झाले, यावर भाष्य करताना त्यांनी उच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ दिला. या जागा पूर्वी पाणपोई होत्या, पण लोकांनी तिथे दाणे टाकून त्याचे कबुतरखाने बनवले, असे कायंदे यांनी सांगितले.
फडणवीसांना धर्मसंकटात टाकले
मनिषा कायंदे म्हणाल्या की, जैन समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धर्मसंकटात टाकल्याचा आरोपही त्यांनी केला. जैन समाजाने निवडणुकीत ‘नोटा’चे बटण दाबून धडा शिकवण्याची धमकी देणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. ‘जैन धर्मात असे कुठे लिहिले आहे?’ असा सवालही त्यांनी विचारला. कबुतरांना दाणे टाकायचे असतील तर त्यांनी आपल्या इमारतींच्या टेरेसवर टाकावे, असे कायंदे म्हणाल्या.
धर्माचा नाही, हा वैज्ञानिक मुद्दा आहे
मनीषा कायंदे यांनी कबुतरांमुळे होणाऱ्या त्रासावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज व्यक्त केली. कबुतरांच्या विष्ठेतून निर्माण होणाऱ्या बुरशी मुळे (फंगस) अनेक लोकांचा मृत्यू होतो. या मृत्यूला कोण जबाबदार आहे, असा संतप्त सवाल त्यांनी केला. जेव्हा गुजरातमध्ये पतंग महोत्सव असतो तेव्हा अनेक पक्षी मरुन पडतात. मांजाने त्यांची मान कापली जाते.हात-पाय कापले जातात तेव्हा खाली रुग्णवाहिका उभी असते तेव्हा कुणाच्या भावना दुखावल्या जात नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्या एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.
तुम्ही कबुतरांची सवय बिघडवली
मनिषा कायंदे म्हणाल्या की, कबुतरांना देवाने पंख दिले आहेत, ते त्यांचे खाद्य स्वतः शोधतात. तुम्ही त्यांना दाणे टाकून त्यांची सवय बिघडवली आहे, असे त्या म्हणाल्या. कोणत्याही प्राणी तज्ज्ञाला विचारल्यास ते हीच गोष्ट सांगतील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. तिथे जैन मंदिर आहे त्याला का जाळ्या लावण्यात आल्या आहेत. मंदिराला पक्षांची जाळी लावण्यात अली आहे. आजचे आंदोलन हे सर्व पूर्वनियोजित आहे. हे जैन समाजाच्या ट्रस्टचे लोकं नव्हते म्हणाता तर आता त्यांचे आयकार्ड चेक करायचे का? सगळी लोक जैन धर्मिय होती की इतर होती. काल मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय दिला, त्यांच्यावर कालचा एक व्हिडिओ पाहा फुटपाथवर एक माणूस धान्य टाकत आहे, कुणीही उठायचे आणि फुटपाथवर धान्य टाकायचे ही कुठली पद्धत आहे.