Pigeons Importance in Jain Community: दादारमधील कबुतरखाना बंद करण्याच्या मुद्द्यावरुन सुरु झालेला वाद आता रस्त्यावरील राड्यापर्यंत आला आहे. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास महापालिकेने ताडपत्री टाकून झाकलेला कबुतरखाना जैन समाजातील लोकांना बळजबरीने हटवला. या कबुतरखान्यावरील ताडपत्री या आंदोलकांनी फाडली. या ताडपत्रीसाठी लावण्यात आलेले बांबूही या आंदोलकांना पाडून बाजूला काढले. त्यानंतर या ठिकाणी या आंदोलकांनी चण्यांच्या गोणी रिकाम्या केल्या. या आंदोलनामुळे कबुतरखाना परिसरामधून ये-जा करणाऱ्या सर्वसामान्यांना वाहतुककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
जैन समाज आक्रमक का झाला?
जैन समाज अचानक आक्रमक झाल्याने आज दादरमधील कबुतरखाना परिसरात मोठा राडा झाला. दादरमध्ये ज्या ठिकाणी कबुतरखाना आहे त्याच्या समोरचं जैन मंदिर आहे. म्हणूनच हा कबुतरखान्याचा मुद्दा जैन समाजाने उचलून धरला आहे. मात्र जैन समाज कबुतरखान्यासाठी एवढा आक्रमक का झाला आहे? जैन समाजामध्ये कबुतरांना खायला घालणं एवढं महत्त्वाचं का मानलं जातं? याबद्दल अनेकांना कल्पना नाही. याबद्दलच आपण या विशेष लेखात जाणून घेणार घेऊयात…
कबुतरांना दाणे टाकण्याची परंपरा आणि धार्मिक मान्यता काय?
धर्मिक मान्यता :
धार्मिक मान्यतेनुसार, भारतीय संस्कृतीमध्ये मुक्या प्राण्यांना खाऊ घालणं हे पुन्याचं काम मानलं जातं. याच भावनेतून कबुतरांना दाणे खायला दिले जातात.
पितृ तृप्ति आणि मुक्ति :
पूर्वजांच्या आत्म्याला तृप्ति आणि पितृ-दोषातून मुक्तीसाठीही पक्षांना खायला टाकतात अशीही मान्यता आहे.
अमावस्येच्या दिवाशी खायला घालणं :
अमावस्येच्या दिवशी कबुतरांना दाणे टाकणं शुभ आणि फलदायक मानलं जातं.
अध्यात्मिक दृष्टीकोन :
कबुतरांना अध्यात्मिक संदेशवाहक मानलं जातं. त्यामुळेच कबुतरांना जास्त महत्त्व आहे.
जैन धर्मामध्ये विशेष महत्त्व का?
जैन धर्मामध्ये विशेष महत्त्व :
कबुतरांना दाणे टाकणे हे जीव दया म्हणजेच करुणेचं प्रतीक मानलं जातं.
धार्मिक कर्तव्य:
जैन धर्मामध्ये जीव दयेच्या परंपरेला धार्मिक कर्तव्य मानलं जातं.
जैन मंदिरं चालवतात कबुतरखाने:
काही जैन मंदिरांकडून आणि ट्रस्टच्या माध्यमातून ‘कबुतरखाने’ चालवले जातात. म्हणूनच दादरमधील कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय म्हणजे धार्मिक विश्वासांवर हल्ला असल्याचं मानत त्याला विरोध करत आहेत.
जैन समाजाने यापूर्वी केलेलं का आंदोलन?
ऑगस्ट 2025 मध्ये, जैन समाजाने दादर येथे ‘शांतिदूत यात्रा’ काढून मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईविरुद्ध निषेध व्यक्त केला आणि हजारो कबुतरांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता.
F&Q
जैन समाजामध्ये कबुतरांना इतके महत्त्व का आहे?
जैन धर्मामध्ये कबुतरांना दाणे टाकणे हे जीव दया (सर्व जीवांप्रती करुणा) या तत्त्वाचे प्रतीक मानले जाते. हे धार्मिक कर्तव्य मानले जाते, जे अहिंसेच्या आणि करुणेच्या मूलभूत तत्त्वांशी जोडलेले आहे. कबुतरांना खायला घालणे हे पुण्याचे कार्य आणि अध्यात्मिक संदेशवाहक म्हणून पाहिले जाते.
कबुतरांना दाणे टाकण्याची परंपरा काय आहे?
भारतीय संस्कृतीत मुक्या प्राण्यांना खायला घालणे हे पुण्याचे कार्य मानले जाते. जैन धर्मात, कबुतरांना दाणे टाकणे हे जीव दया चे प्रतीक आहे, जे धार्मिक कर्तव्य मानले जाते. याशिवाय, कबुतरांना खायला घालणे हे पितरांना तृप्त करण्यासाठी आणि पितृ-दोषापासून मुक्तीसाठीही केले जाते.
दादरमधील कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय का घेतला गेला?
बॉम्बे उच्च न्यायालयाच्या 31 जुलै 2025 च्या आदेशानुसार, कबुतरखान्यांमधील कबुतरांना खायला घालण्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका (जसे की श्वसनाचे आजार) आणि वारसा स्थळांचे नुकसान होत असल्याने, बीएमसीला कबुतरखाने बंद करण्याचे आणि दाणे टाकण्यावर बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले.