Ganeshotsav: सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या POP मूर्तीसंदर्भात मोठा निर्णय; कृत्रिम तलावातच होणार विसर्जन


Ganeshotsav Idol Immerssion: सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या सर्व प्रकारच्या मूर्तीचे विसर्जन यंदा कृत्रिम तलावांत केले जाणार आहे. एरव्ही सहा फुटांच्या खालील पीओपी मूर्तीचे विसर्जन नैसर्गिक स्त्रोतात केले आत होते. यंदा, मात्र या सर्व मूर्तीचे कृत्रिम तलावांत विसर्जन होणार आहे.  त्यामुळे हे तलाव उभारताना त्यांची क्षमता तसेच त्यातील पाण्याची पातळी वाढवावी, विसर्जनासाठी आलेल्या मूर्तीमुळे तलाव पूर्ण भरणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा महत्त्वाच्या सूचना राज्य सरकारने परिपत्रकाद्वारे महापालिकेला केल्या आहेत. 

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीवरील बंदी न्यायालयाने उठवली आहे. मात्र, सहा फुटांखालील पीओपी मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच केले पाहिजे, असे स्पष्ट निर्देशही दिले होते. एरव्ही सहा फुटांच्या खालील पीओपी मूर्तीचे विसर्जन नैसर्गिक स्त्रोतात केले आत होते. यंदा, मात्र या सर्व मूर्तीचे कृत्रिम तलावांत विसर्जन होणार आहे. सहा फुटांपेक्षा जास्त उंचीची मूर्ती असेल आणि अन्य पर्याय नसेल तर नैसर्गिक स्त्रोतात विसर्जन करता येईल, असे स्पष्ट केलं आहे. 

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीवरील बंदी न्यायालयाने उठवली आहे. मात्र, सहा फुटांखालील पीओपी मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच केले पाहिजे, असे स्पष्ट निर्देशही दिले होते. एरव्ही सहा फुटांच्या खालील पीओपी मूर्तीचे विसर्जन नैसर्गिक स्त्रोतात केले आत होते. यंदा, मात्र या सर्व मूर्तीचे कृत्रिम तलावांत विसर्जन होणार आहे. सहा फुटांपेक्षा जास्त उंचीची मूर्ती असेल आणि अन्य पर्याय नसेल तर नैसर्गिक स्त्रोतात विसर्जन करता येईल, असे स्पष्ट केलं आहे. 

याआधी घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करायचं की नाही हे ऐच्छिक होतं. मात्र यंदा सहा फुटांखालील गणेशमूर्तींचं कृत्रिम तलावातच विसर्जन करावं लागणार आहे. त्यामुळे सर्वच गणेशमूर्तींचं विसर्जन कृत्रित तलावात होईल. यामुळे कृत्रिम तलावांवरील भार वाढणार आहे. मुंबई महापालिकेला कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी लागणार आहे. 

मार्गदर्शक तत्त्वे

– आतापर्यंत सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या बहुसंख्य घरगुती गणपतींचे नैसर्गिक स्थळी विसर्जन करण्यात येत होते. आता त्या सगळ्या मूर्तीचा भार आता कृत्रिम तलावांवर येणार आहे हे गृहित धरून नियोजन करणे आवश्यक आहे.

– सर्व विभागीय सहायक आयुक्तांनी मागील वर्षी आपल्या कार्यक्षेत्रातील, तसेच जवळील नैसर्गिक विसर्जन स्थळी विसर्जित करण्यात आलेल्या ६ फुटापर्यंतच्या पीओपी मूर्तीचा आढावा घ्यावा. त्याआधारे यावर्षी कृत्रिम तलावांची संख्या, क्षमतेचे नियोजन व उभारणी करावी.

– कृत्रिम तलावाकडे जाणाऱ्या मार्गावर आवश्यक तेथे दिशादर्शक फलक लावावेत. तसेच विसर्जनापूर्वी निर्माल्य संकलन करण्याची व्यवस्था कृत्रिम तलावानजीक करावी.

– नवीन ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करताना मूर्तीचे विसर्जन, तसेच व्यवस्थापन सुलभपणे करता येईल याची दक्षता घ्यावी, यासाठी ट्रक व इतर वाहनांची वाहतूक सुरळीत होईल अशी स्थळे निवडावीत.

– गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव सलग उपलब्ध व्हावे यासाठी विसर्जित मूर्तीच्या संकलनाची वारंवारिता वाढवण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून विसर्जित मूर्तीमुळे तलाव पूर्णपणे भरणार नाही.

POP मूर्तींवर असणार लाल रंगाचं चिन्ह

राज्य सरकारने शुक्रवारी प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) पासून बनवलेल्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली. आता सर्व POP मूर्तींच्या मागील बाजूस स्पष्ट गोल लाल रंगाचे चिन्ह (तेलाच्या रंगाने रंगवलेले) असणे बंधनकारक करण्यात आले आहे, जेणेकरून त्या सहज ओळखता येतील.

मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच POP मूर्तींवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. POP मूर्तींच्या विसर्जनासाठी कठोर मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. गणेशोत्सव 26 ऑगस्टपासून सुरू होत आहे आणि नैसर्गिक जलस्रोतांमध्ये POP मूर्तींचे विसर्जन हे पर्यावरण प्रदूषणाचे एक मोठे कारण बनते. हे लक्षात घेऊन, सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना आवश्यक सूचना जारी करण्यास आणि काटेकोरपणे पालन सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.

अशी आहे नवी नियमावली

नवीन नियमांनुसार, मूर्ती बनवणाऱ्यांना आणि विक्रेत्यांना पीओपी मूर्तींच्या विक्रीचे रजिस्टर ठेवणे बंधनकारक असेल. आता मूर्ती विक्रीच्या परवान्यासाठी ही एक अनिवार्य अट असेल. यासोबतच, स्थानिक नगरपालिकांना त्यांच्या क्षेत्रातील उत्सव समित्या आणि सार्वजनिक मंडळांची नोंदणी करण्यासाठी एक विशेष कक्ष तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नोंदणी दरम्यान, प्रत्येक स्थापित मूर्तीशी संबंधित तपशीलवार माहिती गोळा करणे बंधनकारक असेल, जसे की ती मूर्ती पीओपीपासून बनलेली आहे की नाही, जेणेकरून विसर्जनाची योग्य व्यवस्था करता येईल.

FAQ

1) यंदा गणेशमूर्तींचे विसर्जन कुठे करावे लागेल?

यंदा सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या सर्व गणेशमूर्ती (घरगुती आणि सार्वजनिक) यांचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करणे बंधनकारक आहे. सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तींसाठी, जर अन्य पर्याय नसतील तरच नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करता येईल.

2) प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) मूर्तींबाबत काय नियम आहेत?

POP मूर्तींवरील बंदी: मुंबई उच्च न्यायालयाने POP मूर्तींवरील बंदी उठवली आहे, परंतु सहा फुटांखालील POP मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे लागेल.
लाल रंगाचे चिन्ह: सर्व POP मूर्तींच्या मागील बाजूस तेलाच्या रंगाने रंगवलेले गोल लाल चिन्ह असणे बंधनकारक आहे, जेणेकरून त्या सहज ओळखता येतील.

3) POP मूर्ती बनवणारे आणि विक्रेते यांच्यासाठी काय नियम आहेत?

विक्री रजिस्टर: मूर्ती बनवणारे आणि विक्रेते यांना POP मूर्तींच्या विक्रीचे रजिस्टर ठेवणे बंधनकारक आहे.
परवाना अट: मूर्ती विक्रीच्या परवान्यासाठी रजिस्टर ठेवणे अनिवार्य असेल.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24