भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांनी शिवसेनेबाबत (शिंदेसेना) एक वादग्रस्त विधान केले होते. भंडाऱ्यात पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना “शिवसेनेचा बाप मीच आहे’ असे बेताल वक्तव्य त्यांनी केले होते. फुके यांनी माफी मागावी यासाठी शिंदेसेना आक्रमक झाली
.
‘पोरगा जसा दहावीमध्ये पास झाला, चांगले मार्क मिळाले तर कोणी केले, पोराने केले किंवा आईने केले. काही चांगले झाले तर कोणी केले आईने केले. आणि काही खराब झाले तर बापाने केले. त्यामुळे मला हे आता पक्के माहित झाले की, शिवसेनेचाही बाप मीच आहे, कारण सगळे खापर माझ्यावर फोडत आहेत’ असे वक्तव्य फुके यांनी केले आहे. या सगळ्या आरोपांवर लक्ष न देता आपण आपले कामे संपूर्ण ताकदीने सुरू ठेवली पाहिजेत, सातत्याने आपला पक्ष वाढवण्याचे काम केलं पाहिजे, असेही फुके म्हणाले होते. विशेष म्हणजे फुके हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास वर्तुळातील मानले जातात.