Pune rave Party Case: पुण्यातल्या उच्चभ्रू वस्तीतल्या रेव्ह पार्टीचा 27 जुलैला पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केलीय. पोलिसांनी अटक आरोपींच्या केलेल्या डिजीटल चौकशीत पोलिसांच्या हाती मोठी धक्कादायक माहिती लागल्याचं सांगण्यात येतंय. रेव्ह पार्टीशी संबंधित एका व्यक्तिच्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये तब्बल 730 व्हिडिओ क्लिप्स मिळाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून येतेय. या सगळ्या व्हिडिओ क्लिप्स कुणाच्या आहेत याबाबत पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरु झालीये. या सगळ्या क्लिप्स कुणाच्या आहेत याचा पोलिसांनी अतिशय गुप्तपणे तपास सुरु केल्याचंही सांगण्यात येतंय.
730 क्लिप्स कुठून आणि कशा आल्या?
एखाद्या प्रकरणात तपास करताना एक किंवा दोन व्हिडिओ क्लिप्स सापडतात. पण ड्रग्ज प्रकरणाशी संबधित व्यक्तीकडं 730 क्लिप्स आल्या कुठून आणि कशा असा प्रश्न पोलिसांच्या डोक्याला झिणझिण्या आणतोय. धक्कादायक बाब तर पुढं आहे. पुणे पोलिसांमधील सूत्रांच्या माहितीनुसार संबंधित व्हिडिओ क्लिप्समधील बहुतांश क्लिप या मोबाईलनं शूट केलेल्या आहेत. या शूट केलेल्या क्लिप्स कुणाच्या आहेत याची माहिती मात्र बाहेर येऊ शकलेली नाही. त्या क्लिप्सबाबत राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये कोणाची तक्रार आहे का याचाही पोलीस दुस-या बाजूनं तपास करतायेत.
या क्लिप्समध्ये कोण कोण आहे?
730 व्हिडिओ क्लिप्स मोबाईलवर शूट झाल्या असतील तर त्या किती वर्षापासूनच्या आहेत याचाही पोलीस तपास करतायेत… या क्लिप्समध्ये कोण कोण आहे याचाही पोलीस शोध घेतायेत.
दबक्या आवाजात काय चर्चा?
ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना कोर्टानं न्यायालयीन कोठडीत पाठवलंय. न्यायालयीन कोठडीत असताना आरोपी जामिनासाठी अर्ज करतात हा सामान्य अनुभव आहे. पण या ड्रग्ज प्रकरणातील आरोपींनी अजूनही जामिनासाठी अर्ज केलेला नाही. जामिनासाठी अर्ज केल्यास पोलीस त्या क्लिप्सचा मुद्दा तर उपस्थित करणार नाहीत ना? अशी भीती आरोपींना असण्याची शक्यता आहे. त्यामुळं चर्चा सुरु असलेल्या त्या व्हिडिओ क्लिप कशाच्या आहेत अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु झालीये.
FAQ
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण काय आहे?
पुण्यातील उच्चभ्रू खराडी परिसरात 27 जुलै 2025 रोजी पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर छापा टाकला. या कारवाईत सात जणांना अटक करण्यात आली असून, कोकेन आणि गांजासारखे मादक पदार्थ, हुक्का आणि दारू जप्त करण्यात आली.
पोलिसांच्या डिजिटल तपासात काय सापडले?
एका आरोपीच्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटमधून तब्बल 730 व्हिडिओ क्लिप्स सापडल्या आहेत. या क्लिप्स बहुतेक मोबाईलवर शूट केलेल्या असून, त्यांच्याशी संबंधित माहिती गोपनीयपणे तपासली जात आहे.