पुण्यातील TCS ऑफिसच्या बाहेर रोडवरच झोपला कर्मचारी; फोटो व्हायरल झाल्यानंतर कंपनीने घेतला मोठा निर्णय


TCS Employee On Footpath:  इंटरनेटवर एक फोटो सध्या तुफान व्हायरल होत होता. पुण्यातील TCS ऑफिसच्या बाहरेचा हा फोटो आहे. या फोटोत टीसीएसचा एक कर्मचारी ऑफिसच्या बाहरे फूटपाथवर झोपलेला दिसत आहे.  पगारावरुन त्याचा कंपनीच्या मॅनेजमेंटसह वाद झाला. रहायलला घर आणि हातात पैसै नसल्यामुळे तो ऑफिस बाहरेच झोपला. त्याचा फोटो आणि पत्र व्हायरल झाल्यानंतर कपंनीने मोठा निर्णय घेतला आहे.  

सौैरभ मोरे असे या TCS कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याचा फोटो आणि आणि त्याच्या तक्रारीचे पत्र सोशल निडियावर व्हायरल झाले आहे. इंस्टाग्रामवर, @beingpunekarofficial नावाच्या अकाऊंटवरुन हे सौरभचा फोटो आणि त्याने लिहीलेले पत्र शेअर करण्यात आले आहे. त्याचा हा फोटोला हजारो लाईक्स आले असून त्याच्या फोटोवर कमेंटचा वर्षाव होत आहे.
काय आहे सौरभच्या पत्रात 

‘मी 22 जुलै 2025 रोजी पुणे येथील टीसीएस सह्याद्री पार्क येथील टीसीएस कार्यालयात तक्रार केली, आणि अजूनही माझा आयडी अल्टीमॅट्रिक्स आणि टीसीएस सिस्टमवर सक्रिय केलेला नाही. मला माझा पगार मिळालेला नाही. 30 जुलै 2025 रोजी झालेल्या बैठकीत याची पुष्टी करण्यात आली की ‘मला आशा आहे की तुम्हाला तुमचा पगार 31 जुलै 2025 रोजी मिळेल.’
मीटिंग दरम्यान, मी एचआरला सांगितले आहे की माझ्याकडे पैसे नाहीत आणि मला टीसीएसच्या बाहेर फूटपाथवर झोपावे लागेल आणि राहावे लागेल. एचआरने यावर कोणताही प्रतिसाद दिला नाही. म्हणून, मी 29 जुलै 2025 पासून टीसीएससमोर फूटपाथवर राहत आहे. हे पत्र इंटरनेटवर खूप वेगाने व्हायरल झाले. X पासून ते इंस्टाग्रामपर्यंत अनेक वापरकर्त्यांनी सौरभचा फोटो रिशेअर केला आहे. 

सौरभचा फोटो व्हायरल झाल्यानंतर कंपनीने खुलासा केला आहे. सौरभ कामावर गैरहजर होता. याबाबत त्याने कळवले नव्हते. यामुळे त्याला पगार देण्यात आला नाही असे कंपनीने सांगितले. सध्या त्याची परिस्थिती पाहता कंपनीने त्याची राहण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, त्याच्या पुन्हा नोकरीवर घेण्याच्या विनंती अर्जाबाबत योग्य निर्णय घेतला जाईल असे कंपनीकडून सांगण्यात आले. 

FAQ

1. सौरभ मोरे यांचा फोटो आणि पत्र का व्हायरल झाले?

सौरभ मोरे यांनी पुण्यातील टीसीएस सह्याद्री पार्क कार्यालयाबाहेर फूटपाथवर झोपल्याचा फोटो आणि त्यांचे तक्रारीचे पत्र सोशल मीडियावर, विशेषत: इंस्टाग्रामच्या @beingpunekarofficial अकाऊंटवर शेअर झाले. या फोटोला हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या, ज्यामुळे हे प्रकरण व्हायरल झाले.

2. सौरभ यांच्या पत्रात काय लिहिले आहे?

सौरभ यांनी त्यांच्या पत्रात खालील मुद्दे नमूद केले:  22 जुलै 2025 रोजी त्यांनी टीसीएसच्या सह्याद्री पार्क कार्यालयात तक्रार नोंदवली, परंतु त्यांचा आयडी अल्टीमॅट्रिक्स आणि टीसीएस सिस्टमवर अजूनही सक्रिय झालेला नाही.  
त्यांना पगार मिळाला नाही, आणि 30 जुलै 2025 च्या बैठकीत त्यांना 31 जुलै 2025 पर्यंत पगार मिळेल असे सांगण्यात आले.  
त्यांनी एचआरला सांगितले की त्यांच्याकडे पैसे नाहीत आणि त्यांना टीसीएस कार्यालयाबाहेर फूटपाथवर राहावे लागेल, परंतु एचआरने यावर कोणताही प्रतिसाद दिला नाही.  
29 जुलै 2025 पासून ते टीसीएस कार्यालयाबाहेर फूटपाथवर राहत आहेत.

3. टीसीएसने याबाबत काय खुलासा केला आहे?

टीसीएसने सांगितले की सौरभ मोरे कामावर गैरहजर होते आणि याबाबत त्यांनी कंपनीला कळवले नव्हते, ज्यामुळे त्यांना पगार देण्यात आला नाही. तथापि, सौरभ यांच्या परिस्थितीचा विचार करून कंपनीने त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे.

 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24