महाराष्ट्रासह देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आपल्या पतीचा जीव घेणे तसेच विवाहबाह्य संबंध ठेवत मित्राच्या मदतीने पतीचा काटा काढणे अशा घटनांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. या अनेक घटनांमधून असे स्पष्ट झाले आहे की पुरुष
.
संघपाल खंडारे यांना त्यांच्या पत्नीच्या भावाने मारहाण देखील केली होती. तसेच त्याच्या नावावर 3 लाखांचे कर्ज देखील काढायला लावले होते. रोजच्या त्रासाला कंटाळून आपणच जीव देऊन टाकू असे ठरवून संघपाल यांनी रेल्वे रुळावर एका रेलवेखाली उडी घेत आपले जीवन संपवले आहे. या घटनेची फिर्याद संघपाल यांच्या वडिलांनी दिली आहे.
संघपाल यांचे वडील सिद्धार्थ खंडारे यांनी फिर्यादेत म्हटले की, मी सिध्दार्थ शंकर खंडारे, वय ६६ वर्षे, चंदा शेती, रा. राहुलमनार, पाटस, ता. बाळापूर, जि. अकोला. समक्ष पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून फिर्यादी जबाब लिहून देतो की, मी वरील ठिकाणी माझी पत्नी पंचशिला हीच्यासह राहण्यास असून मला गौतम व संघपाल अशी दोन मुले आहेत. माझा मोठा मुलगा गौतम हा खाराही, पुणे येथे कंपनीत कामाला असून तेथे तो त्याची पत्नी व दोन मुले यांच्यासह आहे. तसेच लहान मुलगा संघपाल, वथ ३० वर्षे, याने गेले ५ वर्षांपुर्वी शबनम फातिमा, रा. शंकर नगर, अकोट फईल, अकोला हीच्याबरोबर प्रेमविवाह केलेला असून त्याला ३ वर्षे वयाची एक मुलगी आहे.
आज दिनांक ०५/०८/२०२५ रोजी माझा मुलगा संघपाल सिध्दार्थ खंडारे याने पारस रेल्वे स्टेशन येथे रेल्वे ट्रॅकवर कोणत्यातरी ट्रेनसमोर आत्महत्या केलेली असून त्याबाबत रेल्वे पोलीस स्टेशन, अकोला येथे अकस्मात मृत्यू रजिस्टर कमांक २१/२०२५ भा.ना.सु. संहीता कलम १९४ प्रमाणे प्रकरण दाखल करण्यात आलेले आहे. माझा मुलगा संघपाल याने आत्महत्या करण्यापुर्वी त्याच्या मोबाईलमध्ये स्वतःचे काही व्हिडीओ तयार केलेले असून त्या व्हिडीओ मध्ये त्याने सांगितले आहे की, ‘माझे माझ्या बायकोबरोबर भांडण झाले, त्यामध्ये तिचा भाऊ, चुलत भाऊ, त्याचे दोस्त यांनी पायल इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोर, अकोला येथे मला बेदम मारहाण केलेली आहे, मला धमक्या देत आहेत. ८ दिवसांपुर्वी त्यांनी मला ३ लाखाचे कर्ज काढायला लावले आहे, ते मला जगू देणार नाही, माझी पत्नी शबनम फातिमा, तिचा भाऊ अब्दुल हसनिन, बहीण सर्वत अंजुम, तिची आई मसरत वी व त्याचे दोस्त हे मला जिवे मारतील, त्यापेक्षा मीच माझा जिव घेतो.’ असे व्हिडीओ बनवून त्याने आज दि.०५/०८/२०२५ रोजी रात्री ०१.२१ वाजता त्याचा मावस भाऊ कृष्णा हिवराळे, माझा मोठा मुलगा गौतम यांना पाठविले आहेत.

सदरबाबत माझे सांगणे की, माझा मुलगा संघपाल हा अमरावती येथे शिक्षण घेत असताना त्याची ओळख शबनम फातिमा, रा.शंकर नगर, अकोट फईल, अकोला हीच्याबरोबर झाली होती. तिच्याबरोबर गेले ५ वर्षापुर्वी त्याने प्रेमविवाह केला असून ते दोघेही पुणे येथे २ वर्षे राहण्यास होते. गेले ३ वर्षापुर्वी संघपाल त्याच्या पत्नीसह पारस येथे आमच्या घरी येवून राहू, लागला होता. त्यानंतर पुन्हा तो पुण्याला जावून काही दिवस राहून एक वर्षापुर्वी पुन्हा पारस येथे राहण्यास आला. ८ दिवस राहील्यानंतर पती पत्नीमध्ये वाद झाल्याने त्याची पत्नी शबनम ही तिच्या माहेरी अकोला येथे निधूल गेली. व संघपाल आमच्यासोबत राहत होता. ६ महीन्यापुर्वी मी त्याला ऑटो रिक्षा घेवून दिली असून तो अकोला ते पारस, पारस ते निमकर्दा अशी प्रवाशी वाहतूक करत होता.
जून २०२५ मध्ये संघपाल हा पुन्हा त्याचे पत्नीसोबत शंकर नगर, अकोट फईल, अकोला येथे राहण्याकरीता आला. त्यानंतर त्याचे माझे फारसे बोलणे झाले नाही. मला त्याच्या मित्रांकडून संघपाल याने ८ दिवसापुर्वी ३ लाखाचे कर्ज काढले असल्याचे समजले होते.
संघपालला त्याची पत्नी शबनम फातिमा व तिच्या नातेवाईकांनी ३ लाख रूपयांचे कर्ज काढायला लावून तसेच काल दि.०४/०८/२०२५ रोजी त्याच्या पत्नीचे भाऊ, त्यांचे मित्र यांनी मारहाण करून, मानसिक त्रास देवून, धमक्या देवून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेले असल्याने माझा मुलगा संघपाल सिध्दार्थ खंडारे, वय ३३ वर्षे याने पारस रेल्वे स्टेशन येथे रेल्वे ट्रॅकवर कोणत्यातरी ट्रेनसमोर आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे माझी सून शबनम फातिमा व तिचे वरील नातेवाईक, रा. शंकरनगर, अकोट फईल, अकोला यांच्याविरुध्द कायदेशीर फिर्याद असल्याची माहिती संघपालच्या वडिलांनी दिली आहे.