महादेवी हत्तीण गेल्या 33 वर्षांपासून साखळदंडात अडकली होती. तिला अंकुश सारख्या शस्त्राने नियंत्रणात ठेवण्यात येत होतं. काँक्रीटचा स्लॅब हेच तिचे घर होते. पोटाभोवती घट्ट दोरी बांधून तिला जबरदस्ती मिरवणुकीचा भाग बनवण्यात आले. कोल्हापूरच्या नांदणी गावातील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान (जैन मठ) येथे ती एकांतवासात जगत होती. अनेक जखमांशी ती झुंजत होती मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
अनंत अंबानी यांच्या वनतारा येथील Radhe Krishna Temple Elephant Welfare Trust मध्ये आल्यापासून ती आयुष्यात पहिल्यांदाच मुक्त आयुष्य जगत हे. शारिरीक आणि मानसिक जखमांतून ती बरी होत आहे. वनताराने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ‘माधुरीच्या प्राथमिक आरोग्य तपासणीनंतर तिची नखे वाढलेली आणि क्यूटिकल्स, लॅमिनायटिसची लक्षणे, मागच्या उजव्या पायात दीर्घकाळापासून असलेले फोड आणि दोन्ही गुडघ्यांवर सूज यासारख्या दीर्घकालीन समस्या दिसून आला.’
‘रेडिओग्राफमध्ये तिच्या पुढच्या पायात फ्रॅक्चर आणि संधिवात असल्याचे निदान झाले. त्यामुळं वनतारा टीमने तिची अस्वस्थता आणि तिला बरे करण्यासाठी एक उपचारांचा प्रोटोकॉल तयार केला आहे. सध्या तिच्या रिपोर्ट्सची वाट पाहत आहोत. पण एकीकडे पोषणतज्ज्ञ आधीच एक अनुकूल आहाराची योजना आखत आहेत. माधुरीबद्दल काळीजी असणाऱ्या प्रत्येकासाठी आम्ही तिला प्रेम आणि काळजी देण्याचे वचन देतो.’
महादेवी तीन वर्षांची असताना कोल्हापुरात आली. तेव्हा तिला भिक्षा मागण्यासाठीही वापरले जात होते. महादेवी तीन वर्षांची असताना तिच्या आईपासून वेगळी झाली आणि तिला कर्नाटकातून कोल्हापुरात जैन मठात आणण्यात आले. तेव्हापासून ती एकटेच जंगलापासून दूर त्या काँक्रीटच्या शेडमध्ये ठेवण्यात आले. गावात तिला भीक मागण्यासाठी वापरले जात होते.
2017मध्ये पुजाऱ्यावर हल्ला
2017मध्ये मानसिकरित्या अस्वस्थ झाल्यामुळं आणि निराशाजनक राहणीमान, एकटेपणा यातून महादेवीने त्याच जैन मठाच्या पुजाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला होता. ही घटना सामान्य नसून अनैसर्गिक परिस्थितीत ठेवलेले हत्ती अनेकदा निराशा आणि मानसिक त्रासामुळं ते असे वागू शकतात. तसंच महादेवीच्या सोंडेचा वापर लहान मुलांच्या करमणुकीसाठी करण्याचा यायचा. त्यासाठी पैसेदेखील अकारण्यात येत होते.
11 वर्षात 13 वेळा प्रवास
मुख्य स्वामीजींच्या मृत्यूनंतर मंदिराचे विश्वस्त आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी वनविभागाला महादेवीचा ताबा घेऊन तिला प्राणीसंग्रहालयात हलवण्याची विनंती केली होती. 2020 मध्ये राजू शेट्टी पेटाच्या प्रतिनिधींना भेटले होते. त्यात ज्यात तत्कालीन संचालक खुशबू गुप्ता यांचा समावेश होता आणि हत्तीणी महादेवीच्या पुनर्वसनाला पाठिंबा दिला.
2012 ते 2023 दरम्यान, जैन मठाने महादेवीला मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी किमान 13 वेळा बेकायदेशीरपणे राज्याच्या सीमा ओलांडून नेले. आतापर्यंत, मठाला कळले होते की तिला भाड्याने देता येते आणि तिला दुःखी करुन पैसे कमवले जात होते.
तेलंगणात पकडलेली महादेवी महाराष्ट्रात आणली गेली
2022-2023 मध्ये, महादेवीला मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी तेलंगणाला नेण्यात आले होते. 30 जुलै 2023 रोजी, महाराष्ट्रातून तेलंगणामध्ये हत्तीची बेकायदेशीर वाहतूक केल्याबद्दल वन्यजीव संरक्षण कायदा, 1992 च्या कलम 48अ चे उल्लंघन केल्याबद्दल तेलंगणा वन विभागाने महादेवीला ताब्यात घेतले. महादेवीचा ताबा महाराष्ट्र वन विभागाकडे सोपवण्यात आला. तेव्हापासून, महादेवीवर मंदिराचा मालकी हक्क नसून ती सरकारी मालमत्ता असून ती ताब्यात घेण्यात आली आहे झाली.
महादेवीची प्रकृती खालावली, सर्वोच्च न्यायालयाचे पुनर्वसनाचे आदेश
20 जून 2024 रोजी, महाराष्ट्राच्या मुख्य वन्यजीव रक्षकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीला पत्र लिहून महादेवी हत्तीणीचे पुनर्वसन करण्याची शिफारस केली. ग्रेड 4 चा संधिवात, पाय कुजणे, वाढलेले नखे आणि काँक्रीटवर साखळदंडाक आयुष्य घालवल्यामुळे जीर्ण झालेल्या पायांच्या पॅड्समुळे तिची प्रकृती सतत खालावत गेली.
28 जुलै 2025 रोजी, सर्वोच्च न्यायालयाने महादेवीच्या ताब्यात देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या 16 जुलैच्या आदेशाला आव्हान देणारी जैन मठाची अपील फेटाळून लावली. कित्येक वर्षांच्या क्रूरतेमुळे तिला गंभीर संधिवात आणि इतर आरोग्य समस्या असूनही, मठाने तिला सोपवण्यास नकार दिला.
सर्वोच्च न्यायालयाने महादेवीच्याबाजूने निकाल दिला आणि अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, ‘तिला अभयारण्यात नेण्याची व्यवस्था करुन आरामदायी जीवनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे.’
महादेवीच्या स्थलांतरावरून निदर्शने
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता, जैन मठातून महादेवीची सुटका करताना गावकऱ्यांनी पेटा इंडिया आणि अभयारण्याच्या कर्मचाऱ्यांवर शेकडो दगडफेक केली. पेटा इंडियाच्या एका कर्मचाऱ्यांना थेट दगड लागल्याने बरगडीला गंभीर दुखापत झाली. शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांच्यावर या मुद्द्याचे राजकारण केल्याबद्दल हल्ला चढवला आणि म्हटले की, कोल्हापूरच्या भावना हत्तीशी जोडल्या गेल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘माधुरी हत्तीबाबत राज्य सरकारचा निर्णय नाही; हा मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय होता. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयानेही तो कायम ठेवला. या प्रकरणात, सरकार म्हणून, आम्ही फक्त वन विभागामार्फत अहवाल दिला आहे.’
आंदोलकांना उत्तर देताना, वंतारा यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे: ‘आम्हाला तिच्याभोवती असलेले प्रेम जाणवते. माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार, वनतारा येथे तिची काळजी, तज्ञ वैद्यकीयांकडून घेतली जात आहे.’
33 वर्ष एकटी राहूनही आणि मिरवणुकीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर 30 जुलै 2025 रोजी महादेवी हत्तीण तिच्या नवीन घरी जामनगर वनताराच्या राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्र्रस्ट येथे पोहोचली आहे, तिथे महादेवी साखळ्या आणि शस्त्रांपासून मुक्त राहून आणि इतर हत्तींच्या सहवासात राहील. तिच्या सांधेदुखीच्या आजारावर उपचार करण्यासाठी तिला जागतिक दर्जाच्या पशुवैद्यांकडून विशेष पशुवैद्यकीय काळजी देखील मिळेल, ज्यामध्ये हायड्रोथेरपीचा समावेश असेल.
PETA इंडिया आणि भारतीय प्राणी संरक्षण संघटना फेडरेशन (FIAPO) यांनी मंदिरातील विधींमध्ये वापरण्यासाठी जैन मठात एक यांत्रिक हत्ती अर्पण केला आहे आणि सर्व मंदिरांना प्राणी कल्याण आणि मानवी कल्याणासाठी जिवंत हत्तींऐवजी मानवी यांत्रिक हत्ती निवडण्यास प्रोत्साहित केले आहे.