अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कार्य महाराष्ट्रासह देशातील २२ राज्यांत सुरू असून नव्या काळाची आव्हाने पेलण्यासाठी संघटन मजबूत करणे आवश्यक आहे. महिला मेळावे आणि सभासद संमेलनासारखे उपक्रम स्वागतार्ह आहेत, असे प्रतिपादन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. ग
.
पुणे जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष केतकी कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या महिला मेळावा व सभासद संमेलनात ते बोलत होते. या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर, माजी प्रदेशाध्यक्षा मोहिनी पत्की आणि जिल्हाध्यक्ष मंदार रेडे उपस्थित होते. लॉ कॉलेज रोडवरील आगाशे शाळेच्या सभागृहात हा मेळावा पार पडला.
या कार्यक्रमात केतकी कुलकर्णी यांच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी निवडीची घोषणा करण्यात आली. प्रास्ताविकात केतकी कुलकर्णी यांनी ज्ञातीचा अभिमान बाळगून संघटन वाढवण्यावर भर देत महिला आघाडीचे कार्य सुरू असल्याचे सांगितले. उद्योजकीय वृत्ती वाढीसाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
डॉ. कुलकर्णी यांनी लवकरच महासंघाच्या १० हजार पदाधिकाऱ्यांची माहिती असलेले बुकलेट प्रकाशित केले जाईल असे सांगितले. प्रदेशाध्यक्ष लातूरकर यांनी महासंघाच्या विविध शाखांची माहिती दिली.
मोहिनी पत्की यांनी ज्ञातीतील पौरोहित्य करणाऱ्यांना नियमित मानधन आणि ॲट्रोसिटीचा अधिकार मिळावा या मागण्यांसाठी माहिती गोळा करण्याची आवश्यकता व्यक्त केली. यामिनी मठकरी यांनी आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक विषयावर मार्गदर्शन केले. रेणुका जोशी यांनी महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात महासंघासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा स्तरावरील महिला शाखांच्या अध्यक्षांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.