MPSC Recruitment: महाराष्ट्रात सरकारी नोकरी आणि 1.32 लाख पगार, कुठे पाठवाल अर्ज? जाणून घ्या!


MPSC Recruitment2025: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC ने नोकर भरती जाहीर केलीय. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आलाय. 

एमपीएससीकडून ड्रग इन्स्पेक्टर पदांसाठी नवीन भरती जाहीर केलीय. ही भर्ती महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग तसेच औषधि शिक्षण विभाग, मुंबई कार्यालयांसाठी आहे. या भर्ती अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालीय.

किती शिक्षण आवश्यक?

ड्रग इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे फार्मसी किंवा फार्मास्युटिकल सायन्समध्ये पदवी किंवा क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये विशेषज्ञता असलेली पदवी असणे आवश्यक आहे.  उमेदवाराने 21 ऑगस्ट 2025 पर्यंत संबंधित शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असावी.

किती मिळेल पगार?

ड्रग इन्स्पेक्टर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 41,800 ते 1,32,300 रुपये मासिक वेतन मिळेल. वेतनाव्यतिरिक्त, शासकीय नियमानुसार इतर भत्ते आणि गणवेश (वर्दी) प्रदान केला जाईल.

निवड प्रक्रिया कशी असेल?

ड्रग इन्स्पेक्टर पदासाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:उमेदवारांना प्रथम लेखी परीक्षा द्यावी लागेल. लेखी परीक्षेतील कामगिरीच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासली जातील.

किती भरावे लागेल अर्ज शुल्क?

सामान्य वर्गातील उमेदवाराकडून 394 रुपये, आरक्षित वर्ग/महिला उमेदवाराकडून 294 रुपये अर्ज शुल्क घेतला जाईल. उमेदवारांना हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.

अर्ज कसा करावा?

उमेदवार खालील स्टेप-बाय-स्टेप प्रक्रियेचा अवलंब करून अर्ज करू शकतात:सर्वप्रथम, MPSC च्या अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in ला भेट द्या वेबसाइटवरील Latest Updates विभागात जा आणि ड्रग इन्स्पेक्टर भर्तीशी संबंधित लिंक शोधा. भर्तीच्या सर्व तपशीलांची नीट तपासणी करा. New User Registration लिंकवर क्लिक करून नोंदणी करा आणि आवश्यक माहिती भरा. नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून वेबसाइटवर लॉग इन करा. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक तपशील भरा. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने जमा करा.अर्ज पूर्ण झाल्यानंतर, अर्जाचा अंतिम प्रिंटआउट घेऊन तो भविष्यातील संदर्भासाठी जपून ठेवा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख?

अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2025 आहे. उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in वर जाऊन अर्ज करावे.

महत्वाच्या सूचना

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्जामध्ये कोणतीही चूक टाळण्यासाठी सर्व तपशील नीट तपासून घ्यावेत. भर्तीशी संबंधित कोणत्याही अतिरिक्त माहितीसाठी किंवा शंकांचे निरसन करण्यासाठी MPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.अधिक माहितीसाठी किंवा कोणत्याही तक्रारींसाठी, उमेदवार MPSC च्या अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in वर संपर्क साधू शकतात.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24