कळमनुरी तालुक्यातील दाती ते कुर्तडी हा सुमारे दीड किलोमीटर अंतराचा पांदण रस्ता उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भूते यांच्या पुढाकारातून खुला करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे आता दोन गावातील शेतकऱ्यांची वाहतुकीची सोय झाली आहे. महसूल सप्ताह अंतर्गत हा उपक्र
.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल सप्ताह निमित्त विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने फेरफार नोंदणी, शेतकऱ्यांच्या तक्रारींची सोडवणूक, पांदण रस्ते खुले करणे, निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पडताळणी करणे, शासनाच्या विविध योजनांची गावपातळीवर गावकऱ्यांना माहिती देणे या उपक्रमांचा समावेश आहे. त्यानुसार कळमनुरी उपविभागामध्ये उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भूते यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जिवककुमार कांबळे, नायब तहसीलदार बालाप्रसाद धूत तसेच मंडळाधिकारी व तलाठी यांच्याकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत.
दरम्यान कळमनुरी तालुक्यातील दाती ते कुर्तडी हा दीड किलोमीटरचा रस्ता मागील काही वर्षापासून अतिक्रमित झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतूक करणे कठीण झाले होते. दरवर्षी या रस्त्यावरून किरकोळ वाद होऊ लागले होते. त्यामुळे मंडळ अधिकारी आनंद काकडे, ग्राम महसूल अधिकारी जाधव, धनंजय पाटील दातीकर यांच्यासह शेतकऱ्यांनी पांदण रस्ता मोकळा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या दीड किलोमीटर अंतरावर येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. पांदण रस्ता खुला करणे का आवश्यक आहे याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांनीही रस्ता मोकळा करण्यास सहमती दर्शवली. त्यानुसार दीड किलोमीटर अंतराच्या पांदण रस्त्याच्या साफसफाई चे काम सुरू झाले आहे. सुमारे दीड किलोमीटर लांब व सोळा फूट रुंद अंतराचा पांदन रस्ता मोकळा करून रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली जाणार आहे. सध्या साफसफाई झालेल्या भागामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली असून प्रत्येक वृक्षाचे संगोपन करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांवर सोपविली जाणार आहे. मागील अनेक वर्षापासून अतिक्रमित असलेला पांदण रस्ता मोकळा झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या वाहतुकीची सोय झाली आहे.