प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची हत्या करण्याचा प्रयत्न पत्नी आणि तिच्या प्रियकराने केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. २ ऑगस्ट रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास पडेगावच्या कोमलनगर भागात ही घटना घडली. पती झोपेत असताना पत्नीने पतीच्या तोंडावर आधी उ
.
- पडेगाव परिसरातील कोमलनगर भागातील प्रकार
- नागरिकांकडून प्रियकराला चोप, आरोपी पत्नी मुलासह झाली पसार
सुरेश श्रीमंत खालापुरे (४२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते रिक्षाचालक असून त्यांना तीन मुली व एक मुलगा आहे. खालापुरे यांच्या दोन्ही मुलींचे लग्न झालेले आहे. सुरेश यांची आरोपी पत्नी ही वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीत नोकरी करत होती. काही दिवसांपूर्वी तिने काम सोडून दुसऱ्या ठिकाणी काम सुरू केले होते. दरम्यान, २ ऑगस्टला खालापुरे ११ वाजेच्या सुमारास पलंगावर झोपलेले असताना अचानक त्यांच्या तोंडावर उशी ठेवून दाबण्याचा प्रयत्न केला आणि राजू खैरे याने ओढणीने गळा आवळण्याचा प्रयत्न केला.
तीन मुलांची आई असलेल्या आरोपी शीलाच्या दोन मुलींचे लग्नही झालेले
प्रकाराचा आवाज बाहेर घराबाहेर जाऊ नये म्हणून शीलाने वाढवला टीव्हीचा ‘साउंड’ खालापुरे यांनी जेवण केल्यानंतर पत्नी आरोपी शीला हिने घराचा दरवाजा उघडा ठेवून प्रियकर राजूला घरात बोलावले. घरात राजू आल्यानंतर शीलाने दरवाजा ढकलून घेतला. त्यानंतर घरातील आवाज बाहेर जाऊ नये आणि संशय येऊ नये म्हणून तिने टीव्हीचा आवाज वाढवून ठेवला. खैरे यांच्या मदतीला धावून आले घरमालक या वेळी खालापुरे यांच्या ओरडण्याच्या आवाजाने घरमालक जाधव मदतीसाठी धावत आले व त्यांची सुटका केली. तर नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पलंग आणि भिंतीच्या ‘मध्ये’ पडल्यामुळे वाचला जीव खालापुरे यांची हत्या करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी प्रतिकार करण्यास सुरुवात केली. झटापटीमुळे ते पलंग आणि भिंतीच्या मध्ये पडल्याने आरोपींना गळा आवळता आला नाही. आरडाओरड केल्यामुळे वरच्या मजल्यावर राहणारे घरमालक विशाल जाधव तत्काळ खालापुरे यांच्या मदतीला धावले. या प्रकारामुळे गल्लीतील नागरिक जमा होत आरोपी राजूला पकडत नागरिकांनी चोप दिला. दरम्यान, संधी साधत शीला ९ वर्षांच्या मुलाला घेऊन घटनास्थळावरून पसार झाली.