नांदगाव खंडेश्वर आणि वरुड तालुक्यात नापिकी, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक विवंचनेमुळे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिलोडा येथे ३८ वर्षीय राजू भादुजी तिडके यांनी राहत्या घरात सकाळच्या सुमारास गळफास घेतला. त्यांच्या पश्चात पत
.
राजू तिडके यांच्याकडे दोन एकर शेत होते. ते कर्जमाफीची प्रतीक्षा करत होते. शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने त्यांना गावात मजुरी करून उदरनिर्वाह करावा लागत होता. यावर्षीही त्यांनी ओळखीच्या लोकांकडून कर्ज काढून शेतात पेरणी केली होती. मात्र अपुऱ्या पावसामुळे पिकांची स्थिती बिघडली.
त्यांच्याकडे पहाडी भागातील लाल मातीचे शेत असून त्यासाठी पाण्याची जास्त गरज असते. कमी पावसामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असावा, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, वरुड तालुक्यातील घोराड येथे ६० वर्षीय शेतकरी विठ्ठल महादेव नरांगे यांनी शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. नरांगे यांच्याकडे नायगाव शिवारात दोन एकर शेती होती.
शनिवारी सकाळी ते शेतात गेले आणि सायंकाळी ७.३० वाजता परत आले. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचे त्यांच्या मुलाने विचारले असता, ते काही न बोलता बकऱ्या बांधण्याकरिता गोठ्यात गेले. रात्री ९ वाजताच्या सुमारास ते उलट्या करू लागले. त्यांनी विषारी औषध प्यायल्याचे सांगितले.
त्यांना तात्काळ वरुडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. ३ ऑगस्टला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक विवाहित मुलगी, सून व मोठा परिवार आहे.
