मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीमधून हिंदी आणि मराठीच्या मुद्द्यावर रोखठोक भूमिका मांडली आहे. तसंच भाषेवरून मारहाण करणा-यांवर कारवाई करण्याचा इशारा दिखेली फडणवीसांनी दिला आहे. तसंच राज ठाकरेंनी निशिकांत दुबेंना दिलेल्या इशा-यावर फडणवीसांनी भाष्य केलंय.
मागील काही दिवसापासून महाराष्ट्रात भाषेच्या वादावरून चांगलंच राजकारण तापलंय. दरम्यान या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रोखठोक मत मांडलंय. तसंच भाषेवरून हिंसा करणा-यांना देखील फडणवीसांनी इशारा दिलाय. मराठीचा अपमान करणा-यांना मनसैनिकांनी चांगलाच चोप दिला होता. तसंच मराठी न बोलणा-यांना मारहाण केल्याचे काही व्हिडिओ देखील समोर आले होते.
फडणवीसांचा कुणाला इशारा?
भाषेच्या नावे हिंसा नको महाराष्ट्रात मराठी भाषा शिकणं अनिवार्य आहे. महाराष्ट्रात राहणा-यांना मराठी यायला पाहिजे हा आग्रह योग्य आहे. मात्र, मराठी बोलता येत नाही त्यांना मारणं योग्य नाही. मारहाण करणा-यांवर आमचं सरकार कारवाई करणार आहे.
भाषेच्या मुद्द्यावरून शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यातून राज ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. राज्याचे मुख्यमंत्री हिंदी शिकवण्यासाठी आग्रही का असा सवाल राज ठाकरेंनी केला. दरम्यान यानंतर फडणवीसांनी देखील राज ठाकरेंवर पलटवार केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निशिकांत दुबेंनी महाराष्ट्रासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर देखील भाष्य केलंय. भाजप खासदार निशिकांत दुबेंचं पटक पटक के मारेंगे हे विधान चुकीचं आहे. निशिकांत दुबे महाराष्ट्रात आले तर त्यांचं आम्ही स्वागत करू.
हिंदीसंदर्भात मनसेनं घेतलेल्या भूमिकेवरून खासदार निशिकांत दुबेंनी मराठी लोकांना पटक पटक के मारेंगे असं विधान केलं होतं. दरम्यान त्यावर राज ठाकरेंनी दुबेंना डुबे डुबे के मारेंगे असं म्हणत पलटवार केला होता. देवेंद्र फडणवीसांनी दुबेंसंदर्भातल्या वक्तव्यानंतर संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी पायघड्या टाकल्या जाणार असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती होणार अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान यावर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रोखठोक भाष्य केलंय.
‘ठाकरे बंधूंची एकी, राजकीय मजबुरी’ :
राजकीय मजबुरी म्हणून राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आलेत ठाकरेंच्या बंधूंच्या मनात काय हे सांगता येत नाही. मुंबई पालिका निवडणुकीमध्ये
महायुतीचं जिंकणार. मुख्यमंत्री फडणवीसांनी महायुतीमधील सर्वच महत्त्वाच्या मुद्द्यावर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रोखठोक भूमिका मांडली आहे. तसंच भाषेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे बंधूंना देखील इशारा दिल्याची चर्चा आहे.