सावली बार प्रकरणावरून रामदास कदमांचा परबांवर हल्लाबोल: म्हणाले – अर्धवट वकील हेतुपुरस्सर बदनामी करतोय, तू राजीनामा मागणारा कोण? – Maharashtra News



सावली बार प्रकरणावरून राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी माजी मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार शब्दात पलटवार केला आहे. “अर्धवट वकील अनिल परब हेतुपुरस्सर बदनामी करत आहेत,” असा आरोप करत त्यांनी परब यांच्याकडून सभागृहात मा

.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्याच नावावर मुंबईमध्ये सावली बार आहे. या बारवरून अत्यंत गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी केले आहेत. पण तेव्हापासून अनिल परब आणि रामदास कदम यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. अशातच आज रामदास कदम यांनी आज रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी कागदपत्रे दाखवून खुलासे करत अनिल परब यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

नेमके काय म्हणाले रामदास कदम?

एकनाथ शिंदेंच्या सत्ताधारी शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषदेत दस्तऐवज दाखवत काही खुलासे केले. योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावावर असलेले हॉटेल हे शरद शेट्टींना चालवायला दिले होते. त्यावेळी करारनाम्यात कॉलम 6 मध्ये असे म्हटले आहे की, कोणताही बेकायदेशीर धंदा चालवणार नाही. तसेच काही चुकीचे कृत्य घडल्यास जबाबदारी केवळ धंदा चालवणाऱ्यांची राहील, मालकाची नाही.

करारनाम्यातील नियमांचा भंग झाल्याने तसेच अन्य गोष्टी आढळल्याने आम्ही तात्काळ त्याला बाहेर काढले, दोन्ही लायसन्स तेव्हाच जमा केले आहेत. लायसन्स 13 तारखेला जमा केले आहेत. मात्र, अनिल परबने 18 जुलै रोजी विधिमंडळात विषय काढला.

योगेश कदमांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही

या हॉटेलचा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. तू राजीनामा मागणारा कोण?” असं म्हणत रामदास कदम यांनी परब यांच्यावर टीका केली. सावली बारच्या बाबतीत अर्धवट वकील अनिल परब हेतुपुरस्सर बदनामी करत आहेत. हे महाशय दिशाभूल करताहेत, आम्ही लायसन्स पहिलेच जमा केलेले आहेत. डान्सबार सारखे धंदे आम्ही कधी केलेले नाहीत. नियमबाह्य यांनी हे विधानमंडळात हे विषय काढले आहेत. हे आरोप तात्काळ काढून टाकावेत आम्ही सभापतींना अर्ज दिलेला आहे, असे रामदास कदम यांनी सांगितले.

भविष्यात त्यांना प्रत्युत्तर मिळेल, कदमांचा परबांना इशारा

उद्धव ठाकरे आणि अनिल परब हे फक्त योगेश कदम यांना टार्गेट करत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला. त्याचबरोबर “कावळा कितीही काव काव करतो, त्याची आम्ही दखल घेत नाही,” असे म्हणत त्यांनी परब यांची खिल्लीही उडवली. मी सर्वच पत्ते उघड करणार नाही. पण आमच्या अंगावर जे चालून आले त्यांच्यावर नेहमीच मी कायदेशीर कारवाई केलेली आहे, कोणालाही सोडलेले नाही. जे आमच्या मुळावर येण्याचा प्रयत्न करताहेत भविष्यात त्यांना उत्तर मिळेल, असा इशाराही रामदास कदम यांनी अनिल परब यांना दिला.

आव्हाडांवर खोचक शब्दांत टीका

सनातन धर्मामुळे भारताचे वाटोळे झाले. सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल. सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही; तर, ते प्राचीन काळापासून असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. याबाबत रामदास कदम यांना विचारले असता, त्यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया देत आव्हाडांचा विषय संपवला. “त्यांचा धर्मावर खूप अभ्यास आहे, त्यांनी धर्मगुरूच व्हायला पाहिजे.” अशी खोचक टीका रामदास कदम यांनी जितेंद्र आव्हाडांवर केली.

संजय शिरसाटांना शाब्दिक भूमिका बदलण्याचा सल्ला

सरकार म्हणजे आपण, आपण म्हणजे सरकार. त्यामुळे आपल्या बापाचे काय जातंय असे म्हणता येणार नाही. एकेक पैसा सरकारचा योग्य त्या कामासाठीच लागला पाहिजे, असा सल्ला रामदास कदम यांनी मंत्री संजय शिरसाट यांना दिला. शिरसाट साहेब आपली शाब्दिक भूमिका थोडी बदलतील असे मला वाटते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मनसेचे खूप खूप अभिनंदन

मनसे बार तोडफोडीवर भाष्य करताना रामदास कदम यांनी त्यांचे खूप खूप अभिनंदन असे म्हणत कौतुक केले आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात जिथे जिथे लेडिज बार असतील ते सर्व साफ करून टाका असे मी योगेशला सांगितले आहे. वाशीमध्ये जो लेडिज बार योगेशने बंद केला म्हणून हे सर्व घडले आहे.

काही पोलिसांनी योगेशला फोन केले होते हे तुम्ही थांबवा, पण हे थांबवले नाही म्हणून हेतुपुरस्सर योगेशला बदनाम करण्यासाठी काही पोलिसांनी केलेले हे कारस्थान असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला. याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असून, हे पोलिस कोण आहेत याबाबत आम्ही चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24