मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आंतरशालेय निबंध व क्तृत्व स्पर्धा पार पडल्या. वक्तृत्व स्पर्धेत के. आर. टी. विद्यालयाची समृद्धी विंचू प्रथम आली. कथाकथन स्पर्धेत छत्रे न्यू इंग्लिश विद्य
.
पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी बाजीराव महाजन, वाचनालयाचे संचालक नरेश गुजराथी, उपाध्यक्ष प्रज्ञेश खांदाट आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात वाचनालयाचे अध्यक्ष नितीन अध्यक्ष पांडे यांनी सोशल मीडियाच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना वक्तृत्व व लेखनाची वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वाचनालय नियमितपणे या स्पर्धांचे आयोजन करत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले.
या स्पर्धेत एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिव्य मराठी मनमाड वाचनालयात स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करताना मान्यवर.
निबंध स्पर्धा : मोठा गट : ओम पवार (प्रथम, छत्रे स्कूल), जान्हवी महाले (द्वितीय, सरस्वती विद्यालय), समर परदेशी (तृतीय, केआरटी विद्यालय) लहान गट : आभा गुजराथी (प्रथम, प्रकृती स्कूल), वेदांत आहेर (द्वितीय, छत्रे स्कूल), आरोही घोडके (तृतीय, मरेमा विद्यालय) कथाकथन : चिन्मयी पवार (प्रथम, छत्रे स्कूल), आभा गुजराथी (द्वितीय, प्रकृती स्कूल), सक्षम जगताप (तृतीय, छत्रे स्कूल) वक्तृत्व : समृद्धी विंचू (प्रथम, केआरटी विद्यालय), सिद्धेश वाणी (द्वितीय, छत्रे स्कूल), रिद्धी आहिरे (तृतीय, मरेमा विद्यालय)