शिक्षणानं शहाणपण येतं म्हणतात, पण सगळ्यांनाच येत नाही, गेल्या काही महिन्यांपासून समोर येणा-या गुन्हेगारीसंदर्भातल्या बातम्या पाहता तुम्हालाही हे पटलं असेल.. आता नागपुरचीच बातमी पाहा.. उच्चशिक्षित शिक्षिकेनं एक दोन नाही तर तब्बल आठ पुरूषांना फसवलंय. तिचे प्रताप ऐकून सर्वच अवाक झालेत… पाहुयात ‘लुटारू बेगम’ची ही कहाणी…
मंडळी, आज तुम्हाला ‘लुटारू बेगम’ची कहाणी सांगणार आहे.. हा कुठला सिनेमा नाही तर नागपुरातल्या घडलेली घटना आहे, या लुटारू बेगमनं एक, दोन नाही तर तब्बल आठ पुरूषांना फसवलंय. तेही 50 लाख रुपयांना.. नेमकी ती कशी पुरूषांना गंडा घालायची हे समजल्यानंतर पोलीसही चक्रावले आहेत.
अशी होती तिची मोडस ऑपरेंडी
– लुटारू बेगम सोशल मीडियाद्वारे विवाहित पुरूषांवर प्रेमाचं जाळं टाकायची
– पुरूष प्रेमात पडला की त्याला बायको आणि मुलांना सोडून लग्न करण्याचा तगादा लावायची
– पुरूषाशी लग्न होताच खरा खेळ सुरू व्हायचा, एका महिन्यानंतर ती भांडणं करायची, त्यांना धमकावायची
– खोट्या कोर्ट केसेस करून संगनमतानं मिटवू म्हणत त्या कथित पतीकडून पैसे उकळायची
– एकानं दहा लाख रुपयांच्या फसवणुकीची तक्रार केली, पोलिसांनी गुन्हा दाखल केला
– तिने एकूण आठ नव-यांची फसवणूक केल्याचं समोर
– अखेर पोलिसांनी दीड वर्षांपासून फरार असलेल्या लुटारू बेगम समीरा फातिमाला अटक केली
– तिने 50 लाख रूपयांची फसवणूक केल्याची माहिती
महत्त्वाचा मुद्दा, ही लुटारू बेगम उच्चशिक्षित शिक्षिका होती.. तरीही पैशांसाठी कोणत्याही थराला जाणा-या या महिलेला पाहून नुसतं शिक्षणातून शहाणपण येईलच, असं नाही.. ‘