दारूच्या नशेत लेडीज डब्यात शिरला पोलिस शिपाई: महिलांसोबत अश्लील वर्तन, उद्धटपणा करत अरेरावी; बोरीवली-वसई लोकलमधील घटना – Mumbai News



मिरा भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका पोलिस शिपायानेच दारूच्या नशेत महिलांच्या डब्यात चढून अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही संतापजनक घटना शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बोरीवलीहून सुटणाऱ्या वसई स्लो ल

.

डब्यातील महिलांनी सांगितले की, आरोपी सपकाळे हा महिलांच्या पाठीवर कोपराने मारत होता, काही महिलांना तिकीट विचारण्याचा बनाव करत होता, तर महिलांकडे घाणेरड्या नजरेने बघत होता. इतकंच नव्हे तर मोबाईल फोन हिसकावून घेणे, सीटवर जबरदस्तीने बसणं, यांसारख्या वर्तनामुळे अखेर संतप्त झालेल्या काही महिलांनी त्याला नायगाव स्थानकावर गाडीतून उतरवले आणि थेट स्टेशन मास्तरकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर स्टेशन मास्तराने वसई रोड रेल्वे पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांची तत्काळ कारवाई

घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणात महिला प्रवासी अभया अक्षय वेरणेकर यांनी वसई रोड रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. रेल्वे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी पोलिस शिपायाला ताब्यात घेतले आणि वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून अटक केली. आरोपी शिपायावर भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 74 (महिलांच्या मर्यादेचा भंग) आणि कलम 351(2) (धमकी व जबरदस्ती) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

दरम्यान, या प्रकरणामुळे लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा समोर आला आहे. “जर वर्दीतील पोलिसच असे वागत असतील, तर मग सुरक्षा कुणाच्या हवाली?” असा सवाल नागरिक विचारत आहेत. रेल्वेत महिला डब्यात वाढत्या असुरक्षिततेच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलातील शिस्त व नियंत्रण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत कडक पावले उचलण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

हे ही वाचा…

बोरिवली स्टेशनवर प्रवाशाचा तिकीट तपासणीवरून हैदोस:टीसीवर हल्ला, कार्यालयातील सामानाची तोडफोड; आरोपीला अटक

मुंबईच्या लोकल प्रवासात पुन्हा एकदा प्रवाशांची गुंडगिरी समोर आली आहे. आज (शनिवारी) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास बोरिवली स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडली. विरार फास्ट लोकलमध्ये तिकीट तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला, तसेच त्यानंतर टीसी कार्यालयाचीही तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *