बोरिवली स्टेशनवर प्रवाशाचा तिकीट तपासणीवरून हैदोस: टीसीवर हल्ला, कार्यालयातील सामानाची तोडफोड; आरोपीला अटक – Mumbai News



मुंबईच्या लोकल प्रवासात पुन्हा एकदा प्रवाशांची गुंडगिरी समोर आली आहे. आज (शनिवारी) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास बोरिवली स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडली. विरार फास्ट लोकलमध्ये तिकीट तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला, तसेच त्यानंतर टीसी क

.

यासंबंधीच्या प्राप्त माहितीनुसार, टीसी समशेर इब्राहिम हे आपल्या कर्तव्यावर असताना अंधेरी रेल्वे स्थानकाहून विरारकडे जाणाऱ्या फास्ट लोकलच्या चर्चगेट बाजूकडील प्रथम श्रेणी डब्यात तिकीट तपासणी करीत होते. यादरम्यान, तीन प्रवाशांना चुकीच्या क्लासच्या तिकिटांसह आणि एकाला विनातिकिट पकडले. त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी त्याला बोरीवली रेल्वे स्थानकात उतरवून टीसी कार्यालयात नेण्यात आले.

कार्यालयात पोहोचताच एका प्रवाशाने संतापून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याने रेल्वे कर्मचाऱ्यांवर हल्ला केला, तसेच कार्यालयातील संगणक आणि इतर सामानाची तोडफोड केली. या हिंसक हल्ल्यात काही रेल्वे कर्मचारी आणि प्रवासी जखमी झाले असून, कार्यालयातील 1.51 लाखांच्या सामानाचे नुकसान झाले आहे. राहुल सुनील रसाळ (वय 23, राहणार धारावी, मुंबई) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकारानंतर समशेर इब्राहिम यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, बोरीवली रेल्वे पोलिसांनी तत्काळ राहुल रसाळ याला अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एम. खुपेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने देखील या घटनेची गंभीर दखल घेतली असून, सर्व आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी जीआरपीच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा…

दारूच्या नशेत लेडीज डब्यात शिरला पोलिस शिपाई:महिलांसोबत अश्लील वर्तन, उद्धटपणा करत अरेरावी; बोरीवली-वसई लोकलमधील घटना

मिरा भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका पोलिस शिपायानेच दारूच्या नशेत महिलांच्या डब्यात चढून अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही संतापजनक घटना शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बोरीवलीहून सुटणाऱ्या वसई स्लो लोकलमध्ये घडली. पोलिस शिपाई अमोल किशोर सपकाळे (पोलिस आयुक्तालय – मिरा भाईंदर वसई-विरार) हा दारूच्या नशेत थेट महिलांच्या डब्यात चढल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे तो खाकी वर्दीतच होता. पूर्ण बातमी वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *