Friendship Day 2025 : राजकारणात कुणीच कुणाचा कायम मित्र आणि शत्रू नसतो, असं म्हणतात… कारण, एकमेकांवर टिका करणारे नेते एकत्र गप्पा मारताना दिसतात. राजकारणात असूनही मैत्री जपणारे काही नेते आहेत. कुणी शाळेपासून एकत्र आहेत. तर कुणी कॉलेजमध्ये एकत्र होते. तर, कुणी राजकारणात पडल्यावर एकमेकांचे चांगले मित्र बनले. बाळासाहेब ठाकरे शरद पवार, अजित पवार-देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील-उद्धव ठाकरे, आशिष शेलार-राज ठाकरे, शरद पवार-नितीन गडकरी, विलासराव देशमुख-गोपीनाथ मुंडे आणि… राजकारणातील मित्रांच्या Top 10 जोड्यांची कहाणी.
1 बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार
शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. महाराष्ट्रातील हे दोन दिग्गज नेते एकमेकांचे अगदी जवळचे मित्र होते. अनेकदा मातोश्रीवर यांच्या भेटी गाठी व्हायच्या.
2 देवेंद्र फडणवीस – गिरीश महाजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजकारणातला सर्वात जवळचा मित्र म्हणजे गिरीश महाजन. संकटमोचक अशी त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणातली ओळख. फडणवीस नागपूरचे, तर महाजन जळगावचे. मात्र तरीही दोघांमध्ये मैत्रीचं नातं आहे. \
3 अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मैत्री देखील चांगलीच बहरत आहे. पहाटेचा शपथ विधी असो की इतर कोणता राजकीय स्टंट दोघांची छुपी मैत्री लपून राहिली नाही.
4 अजित पवार आणि धनंजय मुंडे
भाजपात फडणवीस-महाजन जसे मित्र आहेत, तसेच राष्ट्रवादीत अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची गहिरी मैत्री आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या मुशीत घडलेले त्यांचे पुतणे धनंजय मुंडे.. मात्र काकांचा पक्ष सोडून धनंजय मुंडे राष्ट्रवादीत आले तेव्हा शरद पवारांचे पुतणे अर्थात अजित पवारांशी त्यांची यारी दोस्ती जमली. गोपीनाथ मुंडे हे राजकीय गुरू असले तरी राजकारणातल्या कठीण काळात मला आधार दिला तो अजितदादांनी, असं ते जाहीरपणं सांगतात.
5 उद्धव ठाकरे आणि संजय राऊत
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची मैत्री देखील खास आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे चार टर्म खासदार आणि सामना या शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक.. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची धुरा खांद्यावर घेतली. पूर्वी बाळासाहेब ठाकरे सामनाचे संस्थापक संपादक होते, तर आता उद्धव ठाकरे संपादक आहेत. मात्र शिवसेना संघटना आणि मुखपत्रातलं संजय राऊतांचं स्थान कायम आहे. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात संजय राऊतांचा सिंहाचा वाटा आहे.
6 जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे
जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे दोघेही दादरच्या बालमोहन शाळेत शिकले आहेत. दोघे शाळेपासूनचे मित्र आहेत. अगदी राजकारणत आल्यानंतरही त्यांची मैत्री कायम आहे.
7 आशिष शेलार आणि राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते मंत्री आशिष शेलार यांची मैत्री सर्वश्रूत आहे. अनेक वेळा त्यांच्या वैयक्तीक गाठीभेटी होतात.
8 शरद पवार आणि नितीन गडकरी
शरद पवार आणि नितीन गडकरी हे दोन्ही नेते फक्त महाराष्ट्रच नाही तर देशाच्या राजकारणातील दिग्गज नेते आहेत. दोन्ही नेते वेगवेगळ्या प७ाचे असले तरी यांच्यात चांगली मैत्री आहे. हे दोन्ही नेते अगदी जाहीरपणे एकमेकांचे कैतुक करतात.
9 गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख
गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख हे नेते एकमेकांचे कट्टर विरोधक मात्र पक्के मित्र. राजकारणात त्यांनी आपल्या वैयक्तीत मैत्रित कधीही दुरावा येऊ दिला नाही.
10 सुप्रिया सुळे आणि द्रमुक खासदार कनिमोळी
राजकारणात जसे मित्र आहेत, तशाच मैत्रिणीही आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि द्रमुक खासदार कनिमोळी यांची मैत्रीही अशीच राजकारणापलीकडची आहे.. सुप्रिया सुळे या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची कन्या. तर कनिमोळी या तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या कन्या. या दोघींमधला मैत्रीचा हा समान दुवा. लोकसभेत एकमेकींच्या सख्ख्या शेजारी असलेल्या या दोघीजणी.
11 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
राजकारणाती सर्वात सच्चे मित्र म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह. या दोघांना राजकारणातले जय आणि वीरू म्हणून ओळखले जाते. 1980 पासून ते एकमेकांचे मित्र आहेत. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्रीही नव्हते, तेव्हापासून त्यांची मैत्री आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका बैठकीत दोघं एकमेकांना पहिल्यांदा भेटले. तेव्हा मोदी संघाचे प्रचारक होते, तर अमित शाह स्वयंसेवक. 2002 मध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी अमित शाहांना मंत्री बनवलं. तेव्हापासून आजतागायत दोघांची दोस्ती कायम टिकून आहे.