हिंदु आणि सनातन धर्माचा अपमान करणाऱ्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. काँग्रेस नेत पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. इतकेच नाही अशा वेळी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्व
.
हिंदुधर्म आणि सनातन धर्म कधीही कोणावर अन्याय करत नाही. हा धर्म सहिष्णू आहे, सहन करणारा आहे. म्हणून हा खऱ्या अर्थाने हिंदुत्व आणि सनातन धर्माचा अपमान करणाऱ्यांना याची किंमत त्यांना चुकवावी लागेल. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदु धर्माचा अपमान करणारे वक्तव्य केलेले आहे. त्याना याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
भगव्या वरील वाराला उत्तर देण्याचे काम शिवसेना करेल
आम्ही हिंदुत्व सोडले नाही, असे म्हणणारे आता कुठे गेले? असा प्रति प्रश्न देखील एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. एवढ्या मोठ्या वक्तव्यावर एकही भ्र न काढणे हे कसे शक्य आहे? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन चाललो आहोत, असा दावा देखील एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ज्यावेळी भगव्या वर वार होईल, त्यावेळी त्याला उत्तर देण्याचे काम आमची शिवसेना करेल, असे देखील शिंदे यांनी म्हटले आहे.
आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…