प्रताप नाईक, कोल्हापूर
Raju Shetty on Mahadevi Elephant: नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीला वनताराला पाठवणं म्हणजे षडयंत्राचा भाग असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे.. पेटा आणि वनतारा यांनी संगणमत करून महादेवी हत्तीण नांदणी मठातून घेऊन गेलेत असंदेखील शेट्टी म्हणाले आहेत. इतकंच नाही तर वनताराला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टनुसार कोणतीही मान्यता नसल्याचे माहिती अधिकारात उपलब्ध झाल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला
एकीकडे नांदणी मठ आणि त्याचबरोबर महादेवी हत्तीणीवर प्रेम करणारे सर्वजण विविध माध्यमातून चळवळ उभी करत महादेवी हत्तीण परत मठात यावी यासाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये लोकप्रतिनिधी देखील मागे राहिलेले नाहीत. पेटा संघटनेच्या तक्रारीवरून महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वनताराला पाठवण्यात आलं. पण हा सर्व षडयंत्राचा भाग होता असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. पेटाच्या पदाधिकारी खुशबू गुप्ता यांनी अंबानी उद्योग समूहाकडून मठासाठी दोन कोटी रुपयांची देणगी देतो पण महादेवी हत्तीन वनताराला सुपूर्द करा अशी विनंती 2020 साली केल्याचं सांगून खळबळ उडवून दिली आहे. इतकंच नाही तर पेटा संघटनेच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप नोंदवला आहे
पाठवून द्या अशी विनंती केली. त्याबरोबरच या हत्तीच्या बदल्यात अंबानी उद्योग समुहाकडून २ कोटी रूपयाची देणगी नांदणी मठास देण्याचा प्रस्ताव त्यांनी मला दिला.
भट्टारक महाराज व विश्वस्त यांच्याशी चर्चाही न करता तो प्रस्ताव मी फेटाळून लावला अखेर पेटाने
— Raju Shetti (@rajushetti) August 1, 2025
पेटा संघटनेच्या कार्यपद्धतीवर राजू शेट्टी यांनी उपस्थित केलेले सवाल गंभीर आहेत. तर दुसरीकडे अंबानी उद्योग समूहाने उभा केलेला वनतारेला वाईल्ड प्रोटेक्शन एक्टनुसार परवानगी नाही. जर त्यांना अशी परवानगी मिळाले असेल तर त्याचा खुलासा वनताराने करावा अशी मागणी करत राजू शेट्टीने वनताराला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टच्या विविध कलम सांगत असताना राजू शेट्टी यांनी गुजरातमधील वनतारावर आक्षेप नोंदवला आहे. इतकंच नाही तर पर्यावरण मंत्रालयानेच वनताराला कोणतीही परवानगी नाही असं सांगून खळबळ उडवून दिली आहे.. पेटा असो किंवा वनतारा यांच्या विरोधात कोल्हापूर आणि त्याचबरोबर नांदणी मठाच्या संलग्न असणाऱ्या 778 गावांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. इतकंच नाही तर सीमा भागात असणाऱ्या आणखी तीन मठाना पेटाने हत्ती वनताराकडे सुपूर्द करावे असा पत्रव्यवहार केला आहे. त्या ठिकाणी देखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. महादेवी हत्तीणीसाठी कोणी रस्त्यावरची लढाई लढत आहे, तर कोणी सह्यांची मोहीम राबवतोय, तर कोणी अंबानी उद्योग समूहाला संलग्न असणाऱ्या कंपन्यांच्या प्रॉडक्टला बॉयकॉट करत आहे. यावरूनच महादेवी हत्तीण वनतारामध्ये नेल्यानंतर पेटा किव्हा वनतारा यांच्याबद्दल जनतेच्या मनात कशा प्रकारे राग आहे हे दिसून येत आहे. पण दुसरीकडे मात्र राजू शेट्टी यांनी थेट पेटा आणि वनतारा याच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप नोंदवत खळबळ उडवून दिली आहे.