Road Accident CCTV Footage: मुंबई आणि बदलापुरमध्ये हिट-अँड-रनच्या दोन दुर्घटना घडल्या आहेत. या दुर्घटनेमध्ये एकूण तिघांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील अपघात हा कीर्ती कॉलेजवळ झाला आहे. तर बदलापुरमधील अपघात हा वाली नाक्यावर झाला. बदलापुरमधील अपघाताचं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
मुंबईतील अपघात कुठे आणि कसा झाला?
कीर्ती कॉलेजजवळ भरधाव ट्रकने स्कूटरला धडक दिल्याने 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून पुरूष जखमी झाला आहे. या प्रकरणामध्ये चालकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना सकाळी 10 वाजून 40 मिनिटं ते 11 वाजण्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला. दादर पोलिसांनी ट्रक चालक रामकुमार यादवला (55) ताब्यात घेतले आहे. 1 ऑगस्ट रोजी दादरमधील वीर सावरकर मार्गावरील कीर्ती कॉलेजजवळ हा अपघात झाला.
पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव वनिता विजय काणेकर आहे आणि जखमी अजित यादव (39) दोघेही वांद्रे (पश्चिम) येथील रहिवासी आहेत. ते स्कूटर (नोंदणी क्रमांक MH08BF2601) वरून वांद्रे ते वीर सावरकर मार्गाने प्रभादेवीकडे जात होते. वनिता प्रभादेवी येथील डॉक्टर होममध्ये गृहिणी म्हणून काम करायच्या. किर्ती कॉलेजसमोरील गुलमोहर वाडी येथे, एका ट्रकने (नोंदणी क्रमांक MH03DV4925) त्यांच्या स्कूटरला मागून धडक दिली. पोलिसांनी सांगितले की, ट्रक चालक बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे गाडी चालवत होता. या धडकेत यादव यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली, तर वनिता काणेकर यांचा पोटाच्या गंभीर दुखापतींमध्ये जागीच मृत्यू झाला. चालक रामकुमार यादव घटनास्थळावरून पळून गेला. धक्कादायक म्हणजे, ट्रक चालक कोणतीही वैद्यकीय मदत न देता घटनास्थळावरून पळून गेला.
बदलापूरमध्ये नक्की काय घडलं?
बदलापुरामध्येही मुंबईमध्ये झालेल्या अपघाताप्रमाणेच भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये अनेकजण जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. आज सकाळच्या सुमारास एका आयशर ट्रकने वाली नाक्यावर तीन ते चार वाहनांना धडक दिली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये एका महिलेसह रिक्षाचालकाचा समावेश आहे. तीन ते चार जण गंभीरित्या जखमी झाले आहेत.
सीसीव्ही फुटेजमध्ये काय?
सीसीटीव्ही फुटेजमध्ये धडक देणाऱ्या आयशर वाहनाचा वेग पाहिल्यानंतर अपघाताची तीव्रता लक्षात येते. सुदैवाची बाब म्हणजे अपघातामध्ये धडक देण्यात आलेल्या कारमध्ये अडकलेल्या एका तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. हा तरुण जिमला जाण्यासाठी निघाला होता. त्याचवेळी वालीवली ऐरंझाडच्या भरधाव वेगात निघालेल्या ट्रकने तीन ते चार वाहनांना धडक दिली. त्यानंतर हा ट्रक चार चाकीवर धडकला. सीसीटीव्हीमध्ये या ट्रकने धडक दिल्यावर रिक्षा अगदी खेळण्यातल्या गाडीप्रमाणे रस्त्यावर आदळत गेल्याचं दिसून आलं. या अपघातामध्ये रिक्षाचालकाबरोबरच अन्य एका महिलेचा मृत्यू झाला. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ…
CCTV Video: ट्रकच्या धडकेनं काही फुटांपर्यंत फेकली रिक्षा, रिक्षाचालकासहीत महिलेचा मृत्यू; थरारक फुटेजhttps://t.co/GB4DqcGf5M < येथे वाचा सविस्तर वृत्त…#Mumbai #RoadAccident #Accident #CCTV #CCTVFootage #HitAndRun #Badlapur pic.twitter.com/AAUIUixh5n
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 2, 2025
अपघातानंतर ट्रक चालकांना घटनास्थळावरून पळ काढला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.