पुढील पाच वर्षांत भारत ऑटोमोबाइल क्षेत्रात अव्वल स्थानावर झेप घेईल. भारताला विश्वगुरू बनवण्याचे लोकमान्य टिळकांचे स्वप्न होते. त्यांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मं
.
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने दरवर्षी देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा गडकरींना प्रदान करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक आदी मान्यवर उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना गडकरी म्हणाले, राजकारणात बऱ्याचदा स्पष्टपणे बोलणे अडचणीचे ठरते. परंतु, नेतेमंडळींनी सकारात्मक राहून सत्य बोलण्याला प्राधान्य दिले पाहिजे. फडणवीस म्हणाले, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजना’ आणि ‘गोल्डन क्वाड्रिलॅटरल’ या दोन महत्त्वाकांक्षी योजनांना मूर्त स्वरूप देण्याचे श्रेय गडकरींना जाते.