वीज ग्राहकांना सेवा देणारे अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विविध क्लेम्स वेळेत निकाली काढावेत तसेच शिस्तभंग कारवाई प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून या प्रणालीचा प्रभावीपणे व
.
छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यक्षेत्रातील मानव संसाधन विभागाची आढावा बैठक तसेच शिस्तभंग कारवाई सॅप मॉड्युल प्रशिक्षण कार्यशाळा हर्सुल येथील महापारेषणच्या सभागृहात झाली. यावेळी संचालक श्री. पवार बोलत होते. सहव्यवस्थापकीय संचालक श्री. आदित्य जीवने, मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री.भूषण कुलकर्णी, प्रभारी मुख्य अभियंता श्री.रंगनाथ चव्हाण (महापारेषण), अधीक्षक अभियंता श्री. मनीष ठाकरे (शहर मंडल), श्री. संदीप दरवडे (ग्रामीण मंडल) यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
संचालक श्री. पवार म्हणाले, वीजग्राहकांना सेवा देण्यासाठी आपले अभियंते, अधिकारी व कर्मचारी अविरत कर्तव्य बजावत असतात. या सर्वांना चांगली सेवा देणे हे मानव संसाधन विभागाचे आद्य कर्तव्य आहे. ग्रॅच्युटी, रजा रोखीकरणासह कर्मचाऱ्यांचे विविध क्लेम्स वेळेवर द्या. अनुकंपा तत्त्वावरील प्रकरणे जलदगतीने निकाली काढा, मानव संसाधन विभागाच्या कामकाजात कृत्रिमपणा टाळून मानवी चेहरा आणा. कर्मचाऱ्यांना सौजन्याची वागणूक द्या. कामात वक्तीशीरपणा व पारदर्शकता आणा. सर्वांना सोबत घेऊन महावितरणचा विकास करा.
महावितरणमुळे आपली प्रगती होतेय, तर आपण कंपनीचे काही देणे लागतो या भावनेतून काम करा, असे संचालक श्री. पवार म्हणाले. शिस्तभंग प्रकरणे प्रलंबित राहिल्याने अनेक कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीवर परिणाम होतो. त्यामुळे ही प्रकरणे वेगाने निकाली काढा. त्यासाठी सॅप ऑनलाइन मॉड्युलचा वापर करा, असे त्यांनी स्पष्ट केले.
महावितरणमधील साडेपाच हजार विद्युत सहायकांच्या भरतीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. निवडलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करा. कागदपत्रांची संबंधित शिक्षण संस्था वा तंत्रशिक्षण मंडळाकडून खात्री करून घ्या, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीला सहायक महाव्यवस्थापक श्रीमती ज्ञानदा निलेकर, श्री. वैभव थोरात (मुख्यालय), श्रीमती शिल्पा काबरा (छत्रपती संभाजीनगर), श्री. चेतन वाघ (लातूर), श्री. प्रदीप सातपुते (नांदेड), श्री. शंकर कुलकर्णी (प्रभारी) (प्रादेशिक कार्यालय), श्रीमती मंजूषा दुसाने (महापारेषण), प्रशिक्षक श्री. तुषार घरत यांच्यासह छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यक्षेत्रातील मानव संसाधन विभागाचे सर्व वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक व उपव्यवस्थापक हजर होते. व्यवस्थापक श्री. शिवाजी तिकांडे यांनी सूत्रसंचालन केले.
छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यक्षेत्रातील मानव संसाधन विभागाच्या बैठकीत बोलताना महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार. सोबत सहव्यवस्थापकीय संचालक श्री. आदित्य जीवने, मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) भूषण कुलकर्णी.