धक्कादायक! जळगावात नगरसेवकाची आत्महत्या, राहत्या घरी गळफास लावून जीवन संपवलं


राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. या बातमीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि जळगाव महापालिकेचे नगरसेवक असलेले अनंत जोशी यांनी राहत्या घरी आत्महत्या केली आहे. अनंत जोशी यांनी ओंकारेश्वर मंदिर परिसरात असलेल्या त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 जळगाव महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक अनंत जोशी होते. तसेच महापालिकेचे गटनेते सुद्धा होते. अनंत जोशी यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आत्महत्येच्या या घटनेमुळे जळगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहा दिवसांपूर्वीच म्हणजे 21 जुलै रोजी अनंत जोशी यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर त्यांनी आज टोकाचं पाऊल उचललं आहे. जोशी यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांसह वेगवेगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली आहे.

शिवसेना एकत्र असताना जोशी शिवसेनेत होते, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेतून उठाव केला. शिवसेनेचे दोन गट पडले, शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट. अनेक दिग्गज नेत्यांनी त्यावेळी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर अनंत जोशी आहे तिथेच राहिले, मात्र अलिकडच्या काळात ते शिवसेना ठाकरे गटात देखील सक्रिय नव्हते अशी माहिती समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनंत जोशी हे काही तरी विवंचनेत होते. पण त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय का घेतला याचे उत्तर कुणालाच माहित नाही. अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन लढ्ढा यांनी यावेळी बोलताना दिली आहे.दरम्यान जोशी यांनी आत्महत्या का केली? नेमकं काय कारण होतं? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या घटनेमुळे जळगावमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24