ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि त्यांचा मुलगा आनंद भोसले यांनी त्यांचे पुण्यातील अतिशय प्राईम लोकेशनवरील लक्झरी फ्लॅट विकला आहे. CRE Matrix च्या माहितीनुसार, 3401 स्केअर फूट घराची किंमत 6 करोड 15 लाख रुपये इतकी मिळाली आहे.
CRE Matrix ने दिलेल्या माहितीनुसार, आशा भोसले यांनी हे घर फेब्रुवारी 2013 मध्ये 4 कोटी 33 लाखाला खरेडी केले होते. त्याच्या तुलनेत आता या घराला 42 टक्क्यांनी वाढ मिळाली आहे.
हे घर नक्की कुठे आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, हे आलिशान घर पुण्यातील अतिशय प्राईम लोकेशनमध्ये आहे. पुण्यातील मगरपट्टा या परिसरातील पंचशील येथे हे लक्झरी घर आहे. या आलिशान घराला तब्बल 182 स्केअर फुटाची ब्लाकनी असून 5 पार्किंग स्पेस आहेत. हे आलिशान घर 19 व्या मजल्यावर असून मराठमोळ्या जोडप्याने घर खरेदी केलं आहे. प्रेरणा गायकवाड आणि संग्राम गायकवाड हे या घराचे नवे मालक आहेत.
किती भरली स्टॅम्पड्युटी?
या आलिशान घराची किंमत 6 कोटी 15 लाख असून त्याचे कागदपत्रं नवीन घरमालकाच्या नावे करण्यासाठी झालेला व्यवहार ही तितकाच महत्त्वाचा आहे. स्टॅम्पड्युटी आणि रजिस्ट्रेशनसाठी 43 लाख रुपये आणि 30 हजार रुपये भरले आहेत.
घराचं लोकेशन नेमकं कुठे?
पंचशील रियल्टीने बांधलेली ही इमारत पुणे विमानतळापासून अंदाजे ९ किमी, खराडीपासून ६ किमी आणि हिंजवडीपासून २५ किमी अंतरावर आहे, जिथे अनेक आयटी कंपन्या आहेत.
पुण्यातील रिअल इस्टेट मार्केटबद्दल
गेरा डेव्हलपमेंट्सने या महिन्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध केलेल्या संशोधन अहवालानुसार, २०२४-२५ (जुलै ते जून) मध्ये पुण्यातील रिअल इस्टेट मार्केटने ८८,००० हून अधिक युनिट्स लाँच केले, जे २०२३-२४ मध्ये याच कालावधीत ९९,००० हून अधिक युनिट्स होते.
अहवालानुसार, पुण्यातील निवासी रिअल इस्टेट मार्केटमध्ये वार्षिक घरांच्या विक्रीत ८% घट झाली आहे. जून २०२४ मध्ये ९३,७३७ युनिट्सवरून जून २०२५ मध्ये विक्री ८६,६६६ युनिट्सवर आली आहे, जरी सरासरी किमती ७.३% ने वाढल्या असल्या तरी.