बदलत्या काळानुसार लोकहिताची कामे करताना महसूल विभागासमोर नवनवी आव्हाने उभी राहत आहेत. त्या आव्हानांवर मात करण्यासाठी नवतंत्रज्ञानाच्या आधारे महसूल विभागाची कार्यक्षमता वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शुक्रवारी ता.
.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित महसूल दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, मुद्रांक जिल्हाधिकारी संजय सुंकवाड उपस्थित होते.
यावेळी बोलतांना गुप्ता म्हणाले की, महसूल विभागाच्या सर्व पातळ्यांवरील समित्यांमधून जिल्ह्याच्या प्रशासनात विश्वासार्हता निर्माण झाली असून, त्यामागे खात्यातील प्रत्येक अधिकाऱ्याची निष्ठा आणि सेवाभाव आहे. प्रशासनाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हिंगोली जिल्हा ई-फेरफाराच्या नोंदी घेण्यात मराठवाडा विभागात प्रथम आला असून, यापुढेही महाराष्ट्रासाठी हिंगोली जिल्हा हा आदर्श जिल्हा ठरावा, यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
महसूल विभागात सुरू असलेल्या माहिती तंत्रज्ञानाच्या नवनवीन बाबींचा वापर करून नवोपक्रमांवर भर द्यावा. सध्याची यंत्रणा मोबाईल-आधारित होत असताना महसूल सेवादेखील लाभार्थ्यांपर्यंत मोबाईलवर डिजिटली स्वरुपात पोहोचविण्याचे धोरण आवश्यक आहे. यामुळे नागरिकांना योजनांचा थेट व पारदर्शक लाभ मिळू शकेल, असेही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाने अधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक ऑनलाइन करण्याचा उपक्रम हाती घेतला असून, उपजिल्हाधिकारी ते गावपातळीवरील सर्व कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक डिजीटल स्वरुपात जतन करण्यात येणार आहे. भूसंपादन, पुरवठा, प्रलंबित प्रकरणे व कोर्टाच्या नोंदी यांचे डिजिटल संग्रह तयार करण्याचे काम महसूल पातळीवर सुरू असून, ही प्रक्रिया भविष्यातील संदर्भांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असेही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सांगितले.
यावेळी वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी बद्दल उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, स्वीय सहायक रंजना कोठाळे यांच्यासह १३ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.