घरपोच सेवा देणार ‘सेवादूत’: नागरिकांना 858 शासकीय सेवा मोबाईल ॲपद्वारे मिळणार – Chhatrapati Sambhajinagar News


छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने ‘सेवादूत’ हे मोबाईल ॲप लाँच केले आहे. या ॲपद्वारे नागरिकांना घरबसल्या विविध शासकीय सेवा मिळणार आहेत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हे ॲप लोकांच्या सेवेत रुजू करण्यात आले.

.

‘सेवादूत’ ॲपद्वारे महाऑनलाईन मार्फत दिल्या जाणाऱ्या ८५८ सेवा नागरिकांना घरपोच मिळू शकतील. नागरिकांनी प्लेस्टोअरवरून हे ॲप डाऊनलोड करून आधार क्रमांक व मोबाईल क्रमांकासह नोंदणी करावी. त्यानंतर हव्या त्या सेवेचा तपशिल द्यावा.

ही माहिती जिल्ह्याच्या डेटासेंटरकडे पाठवली जाईल. तेथून ती नागरिकांच्या नजिकच्या सेवा केंद्राकडे अग्रेषित केली जाईल. संबंधित सेवाकेंद्र चालक नागरिकाच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करेल. विहित कालावधीत संबंधित नागरिकास सेवा घरपोच दिली जाईल.

या सेवेसाठी नागरिकांना १०० रुपये अतिरिक्त आकारले जाणार आहे. ही सेवा ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक आणि आजारी नागरिकांना अधिक उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की प्रशासन नागरिकांना अधिकाधिक सेवा डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमाचा भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

कार्यक्रमास जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे, एकनाथ बंगाळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक शरद दिवेकर यांची उपस्थिती होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24