आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मेळावा घेतला. या वेळी प्रकृती खराब असल्याने आज आपण जास्त बोलणार नसल्याचे राज यांनी म्हटले आहे. या वेळी त्यांनी प
.
या विषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार माध्यमांशी संवाद साधू नका, अशा सूचना महाराष्ट्र निर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बोरिवली मध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना या महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. आगामी काळात कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जायचे आहे? कोणत्या गोष्टी समोर येणार आहेत? याची सर्व माहिती दिली जाईल. यासाठीच हा मेळावा असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांशी कोणीही संवाद साधायचा नाही. प्रसार माध्यमांशी संवाद साधने हे सर्वांसाठीच बंद केले असल्याचे राज ठाकरे यांनी या वेळी सांगितले. प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी कोणाकडेही जाऊन तुला काय वाटते? असे विचारतात. मात्र ते ऐकून मला काय वाटते? हे जास्त महत्त्वाचे असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत..