कोकाटेंचा राजीनामा घ्या, राज्याची नाचक्की थांबवा: रमी खेळल्याचे बक्षीस म्हणजे क्रीडा मंत्रालय? सुप्रिया सुळेंची जहरी टीका – Mumbai News



राज्यातील कृषी क्षेत्र कोलमडून पडलेले असताना आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नसताना, अशा संवेदनशील काळात कृषिमंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे विधिमंडळात ‘रमी’ खेळताना दिसले. यावरूनच त्यांची संवेदनशीलता किती आहे हे स्पष्ट होते, असा घणाघातच खासदार सुप

.

ट्विटर (X) वर पोस्ट करत त्यांनी कोकाटे यांच्यावर आणि त्यांच्या समर्थनार्थ उभ्या असलेल्या सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. “विधिमंडळात रमी खेळण्याचे बक्षीस म्हणून कोकाटे यांना क्रीडा व अल्पसंख्याक विकास खाते देणे, म्हणजे राज्याच्या प्रतिष्ठेची विटंबना” असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना राजीनाम्याची मागणी केली. याचबरोबर त्यांनी हेही म्हटले की, ज्या मंत्र्यांनी महाराष्ट्राला ‘भिकारी’ म्हटले त्या मंत्र्यांना नारळ द्यावा, असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला.

सुप्रिया सुळे यांचे ट्विट काय?

खासदार सुप्रिया सुळे यांनी X वर पोस्ट करत म्हटलं आहे की, राज्यातील कृषी क्षेत्र पुर्णपणे कोलमडून पडलेले असताना विधिमंडळात बसून रमी खेळणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किती संवेदनशील असतील? याहून कहर म्हणजे या कृषिमंत्र्यांचे केवळ खाते बदलून अभय देणारे सत्ताधारी किती गंभीर असतील ? याची शंका आल्याशिवाय राहत नाही. आपले पद आणि जबाबदारी यांची किंचितही जाणीव नसणारी व्यक्ती मंत्रीमंडळात आहे याची खरंतर राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना खंत वाटली पाहिजे.

मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठा जपावी

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्र शासनाला ‘भिकारी’ म्हणून राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवणाऱ्या मंत्री महोदयांना नारळ देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. विधिमंडळात रमी खेळण्याचे बक्षीस म्हणून त्यांना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रीपद देण्याचा निर्णय खरोखरच अनाकलनीय आहे. या सरकारचे प्राधान्यक्रम काय आहेत याची चिरफाड यामुळे झाली. एकिकडे राज्यातील तरुण पिढी ऑनलाईन रमीच्या मागे लागून बरबाद होत आहे. तिच्यावर बंदी घालण्याची मागणी होत असताना माणिकराव कोकाटे यांना विधिमंडळात रमी खेळण्याचे बक्षीस म्हणून क्रीडा व युवक कल्याण यासारखे महत्वाचे खाते दिले जाते यासारखा दुसरा क्रूर विनोद नाही. मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की कृपया आपण माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन राज्याची प्रतिष्ठा जपण्याचे काम करावे, असे सुळे यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24