एरंडोल तालुक्यातील सर्वात मोठे गाव कासोदा हे गाव असून गावाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. मात्र येथे तयार होणारे झोरे व सतरंजी हे देशात प्रसिद्ध आहेत. येथील ७० टक्के विक्रेते संपूर्ण महाराष्ट्र तसेच आजूबाजूला असलेल्या राज्यांमध्ये चादर व सतरंज्या विक्री क
.
तसेच येथे भाद्रपद महिन्यात हरिनाम कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. या किर्तन सप्ताहाची सांगता पौर्णिमेस करण्यात येवून यात लाखोंच्या संख्येने भाविक येतात. रात्री पालखीची संपूर्ण गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. विशेष म्हणजे येथील महादेव मंदिराशेजारील तलावाच्या पाण्याने वर्षभर धान्य शिजत नाही परंतु ह्याच दिवशी तुरदाळ व भात शिजतो हे विशेष आहे. महाराष्ट्रातील कासोदा येथील किर्तन सप्ताहाचा दुसरा क्रमांक लागतो. तर सादिक शाह बाबांचा दर्गा आहे. गावात हिन्दू-मुस्लिम समाज एकात्मतेत राहतात व एकमेकांचे सण साजरे करतात. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत कासोद्याची असून येथे सहा प्रभागात एकूण १७ सदस्य आहेत. विविध निधी अंतर्गत येथे काँक्रिटीकरण रस्ते, भूमिगत गटार, सभामंडप असे अनेक विकास कामे झालीत तर काही सुरु आहेत. गावाच्या सुरुवातीस असलेले गोविंद महाराज प्रवेशव्दार हे गावाचे आकर्षण ठरत आहे. सरपंच पुरुषोत्तम चौधरी तर आकांशा बियाणी उपसरपंच आहेत. कासोदा येथील गोविंद महाराज प्रवेशव्दार हे गावाचे आकर्षण ठरत आहे. संतरजी व झोऱ्याच्या व्यवसायामुळे राज्यात प्रसिद्ध
कच्च्या सुतापासून झोऱ्यांची निर्मिती येथील व्यावसायिक कच्च्या सुतापासून विणकाम करुन मोठ-मोठे झोरे बनवतात. कारागिरांकडून हाताने तयार केल्या जाणाऱ्या या झोरे व सतरंजीची एक वेगळी ओळख आहे. त्यामुळेच झोऱ्या, सतरंजीसाठी कासोदा ओळखले जाते. तसेच कासोदा या गावाची ओळख ही वसंत सहकारी साखर कारखान्यावरुन देखील आहे. १९७३ साली स्थापन करण्यात आलेल्या जिल्ह्यातील एकमेव या कारखान्यात डीस्टलरी उत्पादन व्हायचे. परंतु सध्या हा साखर कारखाना बंद स्थितीत आहे.