नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बुद्धिबळ विश्वचषक विजेती दिव्या देशमुख हिने महाराष्ट्र आणि दाक्षिणात्य राज्यांच्या बुद्धिबळ स्थितीबद्दल परखड मत मांडले. तिच्या मते, महाराष्ट्रात बुद्धिबळाविषयी सकारात्मक वातावरण असले तरी दाक्षिणात्य राज्यांचे या ख
.
दिव्याने वयाच्या १९व्या वर्षी विश्वचषक जिंकला तर गुकेश दोमाराजूने १८व्या वर्षी जगज्जेतेपद पटकावले. तरुणांनी बुद्धिबळ करिअर म्हणून स्वीकारावे का, या प्रश्नावर दिव्याने सांगितले की हे प्रत्येकाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. मिळणारे वातावरण, पाठिंबा आणि आर्थिक घटक महत्वाचे असले तरी सर्व अडचणींवर मात करता येते.
विश्वचषक विजयाबद्दल बोलताना दिव्या म्हणाली की तिला आनंद जरूर आहे, पण ती त्यावर समाधानी नाही. हा केवळ प्रवासाचा प्रारंभ असून आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे. खेळादरम्यान दबावाबद्दल विचारले असता तिने सांगितले की दबाव अनेक वर्षांपासून आहे, परंतु एकदा खेळायला सुरुवात केली की तो झुगारून देते.
दिव्याचे वडील डॉ. जितेंद्र देशमुख यांनी तिच्या विजयाचा भारतीय म्हणून अभिमान व्यक्त केला. त्यांच्या मते विजयात प्रादेशिकवाद आणू नये, तरीही एक महाराष्ट्रीय आणि नागपूरकर म्हणून हा गौरवाचा क्षण आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष परिणय फुके यांनी दिव्याच्या नावाने नागपुरात बुद्धिबळ प्रशिक्षण अकादमी सुरू करणार असल्याची घोषणा केली.
