चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणातील मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही मुलगी नागरिकांना झुडपात बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. उपचारादरम्यान तिला पॅरालिसिसचा अटॅक आला होता. यामुळे तिला घटनेबद्दल काहीही स
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १७ जुलै रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चंदननगर भाजी मंडई येथे कोणीतरी अज्ञात इसमांनी एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला अचानक मारहाण केली. त्यामुळे घाबरून ती खराडीतील चौधरी वस्ती येथे झाडा झुडपांमध्ये लपली होती. त्यानंतर ती बेशुद्ध झाली.
दुसऱ्या दिवशी काही स्थानिक नागरिकांच्या मदतीने व पोलिसांनी तिला ससून हॉस्पिटल येथे दाखल केले. त्यानंतर चंदननगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान तरुणीने जबाबात तिचे मित्र सनी प्रेमसिंग बिके (३१, रा. खुळेवाडी) आणि सनी ऊर्फ विशाल विकास ससाणे (३०, रा. यमुनानगर, विमाननगर) यांच्यावर संशय घेतला. त्यानंतर दोघांना २१ जुलै रोजी अटक करण्यात आली. मात्र, पुढील घटनाक्रम सांगण्याआधीच तिला पॅरालिसिसचा अटॅक आला. दरम्यान, आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना ३० जुलै रोजी सकाळी ७ वाजता तिचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक किरण नरवडे करीत असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.