राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर याला पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात आज कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये प्रांजल खेवलकर मोबाईलमधील अतिशय आक्षेपार्ह व्हिडीओ कोर्टात दाखवण्यात आला.
प्रांजल खेवलकर याच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व्हिडीओ सापडला. मोबाईलमध्ये मुलीचे व्हिडीओ दुसऱ्या आरोपीला पाठवत ‘ऐसा माल चाहीए…’ असा मेसेज केला, असा दावा पोलिसांनी कोर्टात केला आहे.
प्रांजल खेवलकर याची पोलीस कोठडी आज संपत असल्याने त्याच्यासह इतर आरोपींना कोर्टात हजर केलं. यावेळी पोलिसांनी कोर्टात हजर केलं. यावेळी पोलिसांनी आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी देखील केली. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला तसेच यानंतर कोर्ट आता पोलीस कोठडीबाबत निकाल देणार आहे. पण कोर्टात आज सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद आणि पुणे पोलिसांनी दिलेली माहिती याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे.
रेव्ह पार्टी सुनावणी संपूर्ण घटनाक्रम पोलिसांनी यावेळी कोर्टात मांडला. यावेळी पोलिसांनी इतर माहिती देखील सादर केली. ज्यामध्ये मोबाईलमधील चॅट आणि व्हिडीओ यांचा समावेश आहे. या चॅटमध्ये काही महिलांचा उल्लेख आहे, असा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. तसेच आरोपी तपासात सहकार्य करत नाही अशी माहिती देखील पोलिसांनी यावेळी कोर्टाला दिली. महत्त्वाचं म्हणजे 5 आरोपींमध्ये दोन गट पडले आहेत. एक गट हा प्रांजल खेवलकर, त्यांचे मित्र समीर भांबे आणि समीर सय्यद यांचा आहे. तर दुसरा गट हा श्रीपाद यादव आणि निखिल पोपटानी यांचा आहे.
प्रांजल खेवलकर याच्या वकिलांनी काय म्हटलं?
प्रांजल खेवलकर याच्या वकिलांनी देखील यावेळी कोर्टात युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी सांगितलं की, श्रीपाद यादव आणि निखल पोपटानी यांनी प्रांजल खेवलकर यांच्याशी सलगी वाढवली आणि त्यातून त्यांनी खेवलकर यालाअडकवण्याचा प्रयत्न केला आहे. हे दोघं जण आधी खेवलकर याच्या फ्लॅटवर गेले. तिथे रात्री अकरा वाजेपर्यंत पार्टी केली. नंतर ते बॉलर नावाच्या पबमध्ये गेले. तिथून रात्री 2 वाजता खेवलकर हे आपल्या फ्लॅटमध्ये परत आले. पण पोपटानी आणि यादव हे दुसऱ्या एका पबमध्ये गेले. पण पब बंद असल्याने ते पुन्हा खेवलकर याच्या फ्लॅटमध्ये आले. यावेळी त्यांच्यासोबत दोन मुली होत्या. त्यापैकी एका मुलीच्या बॅगमध्ये अंमली पदार्थ सापडल्याचा युक्तिवाद खेवलकरांच्या वकिलांनी केला आहे.