टेरिफ लादत भारताचा आर्थिक कणा मोडण्याचा प्रयत्न अमेरिकेच्या ट्रम्प सरकारकडून केला जात आहे, याची जबाबदारी त्यांचे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. राऊत म्हणाले की, वयाचे 75 वर्षे पूर्ण होण्याची कसली वाट पाहता आ
.
संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या कोणत्याही समस्येकडे डोकावून पाहण्यासाठी तयार नाही. मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत याचे देशाला ओझं झाले आहे असे आम्हाला वाटत आहे. कदाचित ते रा.स्व.संघ आणि भाजपच्या अनेकांना झाले आहे. जर देश वाचवायचा असेल कणा मोडू द्यायचा नसेल तर मला असे वाटते की भाजपा आणि विरोधकांनी भूमिका घेणं गरजेचे आहे. माझ्या माहितीप्रमाणे सहा तारखेला इंडिया आघाडीची बैठक दिल्लीमध्ये होत असून यासाठी देशभरातील नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांत उद्धव ठाकरे यांनाही बोलावले आहे, या बैठकीत यावर चर्चा केली जाईल.
भाजपची वाचा लुळी पडली
संजय राऊत म्हणाले की, ट्रम्प जर देशाच्या पंतप्रधान आणि सरकारला फाट्यावर मारत आहे कारण आपले सरकार लाचार, दुबळे आहे. हे सरकार अत्यंत डरपोक आहे कारण सरकारचे हात हे ट्रेंडमध्ये अडकले आहेत.यांना फक्त काही उद्योजकांना जो अमेरिका आणि जगात व्यापार करायचा आहे त्यासाठी हे ट्रम्प ची दादागिरी सहन करत आहे. पण देशाच्या स्वातंत्र्यावर ट्रम्प यांनी हल्ला केला आहे. कारण देशामध्ये वाईट परिस्थिती निर्माण होणार आहे. काही उद्योजकांच्या फायदा होण्यासाठी मोदी सरकार अमेरिकेची दादागिरी सहन करत आहे. अमेरिका आपल्याला फाट्यावर मारत आहे. रशियासोबत व्यवहार केल्याने ट्रम्प यांनी भारताला दंडित केले आहे. भारताला दंडित करणारा ट्रम्प आहे कोण? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. रशिया सोबत व्यवहार केल्याने भारताला दंडित करण्याचे काम मोदींची मित्र ट्रम्प यांनी केले आहे. यानंतर भाजपची वाचा लुळी पडली आहे, मोदी, शहा गायब झाले आहे, असे म्हणत राऊतांनी निशाणा साधला आहे.
आमचा भारत देश अन् मोदींचे राष्ट्र वेगळे
संजय राऊत म्हणाले की, आमचा भारत देश आणि मोदी यांचे राष्ट्र वेगळे आहे. भाजप वाल्याचे मोदी राष्ट्र आहे. आम्ही भारताचा विचार करतो. ट्रम्प यांच्या धोरणावर भाजपच्या एकाही नेत्याने आपली प्रतिक्रिया दिली नाही. इतकेच नव्हे तर पाकिस्तानमध्ये जे तेल आहे त्यासंदर्भात पाकिस्तान आणि ट्रम्प एकत्र काम करत पाकला आर्थिक दृष्टीने सक्षम करण्याचे काम मोदींचे मित्र करणार आहे.
सरकारने शेपुट घातले
संजय राऊत म्हणाले की, ट्रम्प ची अशी हिंमत आहे, ते मोदी सरकारला फाट्यावर मारत म्हणत आहे की पाकिस्तानकडून भारत तेल खरेदी करेल. म्हणजे ट्रम्प अशी परिस्थिती निर्माण करणार आहे की पाकिस्तानकडून आम्ही तेल घ्यावे, व्यापार करावा. दहशतवाद विसरुन जावा. भारताविरोधात पाकिस्तानला ताकद देण्याचे काम जर ट्रम्प करत असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचा धिक्कार करणे गरजेचे आहे. गेले 60 वर्षे आम्ही पाकिस्तानविरोधात लढत आहोत.या सरकारने शेपुट घातले आहे. आता कुठे गेले ते स्वत:ला राष्ट्रभक्त म्हणून घेणारे, त्यांनी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी राहण्याचा अधिकार उरला आहे का याचा विचार करावा.