मुंबई – खासगी शिकवणीत शिक्षण की छळ? हस्ताक्षर चांगलं नसल्याने चिमुकल्याला जळत्या मेणबत्तीने दिले चटके


Mumbai Crime News: मुंबईतील मालाड पूर्वेतील गोकुळधाम परिसरात एक धक्कादायक घटना घडलीय. यामध्ये एका चिमुरड्याशी अमानुष वागणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका खासगी शिकवणी वर्गात फक्त हस्ताक्षर नीट न काढल्यामुळे तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर शिक्षिकेने जळत्या मेणबत्तीचे चटके दिल्याची घटना उघडकीस आली आहे.

ही घटना मालाड पूर्वेतील फिल्मसिटी रोडवरील गोकुळधाम परिसरातील एका नामांकित खासगी शिकवणीत घडली आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षिकेचे नाव राजश्री राठोड असल्याची माहिती कुरार पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या घटनेनंतर पालकांची पोलिसांकडे तक्रार

मालाडमधील एका शिकवणीमध्ये झालेल्या या घटनेत तिसरीमध्ये शिकणाऱ्या चिमुरड्याच्या हातावर भाजलेल्या खुणा पाहून पालकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी पालकांनी जेव्हा तिला जाब विचारला तेव्हा हे संपूर्ण प्रकार उघड झाला. या प्रकारामुळे विद्यार्थ्याच्या पालकांनी तीव्र संताप व्यक्त करत शिक्षकेने केलेल्या अमानुष वागणुकीविरोधात कुरार पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पालकांनी तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी शिक्षिका राजश्री राठोड यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कुरार पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी सुरू केली असून लवकरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

पालकांकडून शिक्षिकेवर कठोर कारवाईची मागणी

शिक्षण क्षेत्रात अशा प्रकारची अमानुष वागणूक निंदनीय असून मुलांवर शारीरिक शिक्षा करणे हे कायद्यानेही गुन्हा आहे. या घटनेमुळे पालक वर्गामध्ये भीती आणि संतापाचं वातावरण पसरलं असून संबंधित शिक्षिकेवर कठोर कारवाई होण्याची मागणी केली जात आहे. 

या सर्व प्रकार लक्षात घेतल्यानंतर आता लहान मुलांना खाजगी शिकवणीमध्ये पाठवावे की नाही असा प्रश्न पडला आहे. या घटनेनंतर अनेक पालकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. याआधी देखील अशा काही घटना घडल्या असून पुन्हा मुंबईतील ही घटना पाहून अनेकजण हैराण झालेत. या प्रकरणी सरकारने लक्ष घालून या शिक्षिकेवर कारवाई करावी अशी मागणी आता पालकांकडून केली जात आहे. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24