संसदेत आज पावसाळी अधिवेशनाचा 8 वा दिवस आहे. राज्यसभेत सलग दुसऱ्या दिवशी ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होत आहे. या चर्चेदरम्यान बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. पहलगाम हल्ल्यासाठी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अश
.
संजय राऊत म्हणाले, संपूर्ण काश्मीरमध्ये आर्म फोर्स कायदा लावला आहे. तेथील राज्यपाल देखील तुमचे आहेत. ते मजबूत व्यक्तीमत्व आहे. तरीही पहलगाममध्ये दहशवादी हल्ला झाला आणि हल्लेखोर पसार झाले. राज्यपालांनी देखील सुरक्षेत चूक झाल्याचे मान्य केली. जर सुरक्षेत चूक झाली आहे, 26 माता-भगिनींगे सिंदूर मिटवल्या गेले, तर त्याची जबाबदार कोण घेणार? आणि जबाबदारी घेऊन राजीनाम कोण देणार? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
26 जणांच्या हत्येनंतरही कोणीच राजीनामा दिला नाही
पंडित नेहरू, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प की व्हान्स राजीनामा देतील का? देशाच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. ही त्यांची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. या देशात उपराष्ट्रपतींचा राजीनामा 24 तासांच्या आत घेण्यात आला, कारण ते तुमचे ऐकत नव्हते. पण 26 जणांच्या हत्येनंतरही कोणीच राजीनामा दिला नाही आणि कोणाकडूनही माफी मागितली गेली नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
पंतप्रधानांना लगावला टोला
आपले पंतप्रधान स्वत:ला देवाचा अवतार मानतात. ते देखील म्हणतात की, मला वेळेच्या आधी काही गोष्टी जाणवतात, ही देवाची कृपा आहे. मग पहलगाम हल्ला तुम्हाला का कळला नाही. हा आपल्यासमोर आणि देशासमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे, असा टोला संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.
नेहरूंमुळेच भाजपवाले आज सत्तेत बसलेत
हे सरकार भूतकाळात रमणारे आहे, त्यामुळे प्रत्येक चूक ही नेहरुंच्या माथी मारली जाते. पंडित नेहरू त्यांना झोपू देत नाहीत आणि त्यांना जगूही देत नाहीत. पंडित नेहरुंमुळेच आज भाजपवाले समोर सत्तेत बसले आहेत. भाजपवाल्यांनी नेहरुंचे आभआर मानले पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले.
सरदार पटेलांनी पहिल्यांदा RSSवर बंदी घातली
राऊत म्हणाले- ‘सरदार पटेल यांना पंतप्रधान न बनवून आम्ही ऐतिहासिक चूक केली. सरदार वल्लभभाई पटेल यांनी पहिल्यांदा आरएसएसवर बंदी घातली होती. जर सरदार पटेल आणखी 10 वर्षे जगले असते, तर आज हे लोक समोर दिसले नसते. पंडित नेहरूंमुळे तुम्ही आज येथे बसला आहात याबद्दल तुम्ही आभारी असले पाहिजे.’