वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी संस्थेला मिळाली मोठी मान्यता: त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची मान्यता मिळवणारी देशातील पहिली संस्था ठरली – Pune News



पुणे येथील वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची मान्यता मिळवणारी देशातील पहिली संस्था बनली आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली.

.

या संस्थेत सध्या चार दीर्घकालीन पदवी आणि सहा अल्पकालीन कौशल्यवर्धित अभ्यासक्रम चालवले जातात. आता हे सर्व अभ्यासक्रम त्रिभुवन विद्यापीठाअंतर्गत चालवले जातील. पारंपारिक अभ्यासक्रमांसोबतच आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहकारातील वापरासंबंधीचे अभ्यासक्रमही शिकवले जातील.

वैकुंठभाई मेहता संस्थेच्या वतीने सध्या कृषी व्यवसाय व्यवस्थापनाचा २ वर्षांचा पदव्युत्तर-पदविका, सहकार विषयातील २ वर्षांचा पदव्युत्तर-पदविका, सहकारी बँकिंग आणि वित्त विषयातील ४ वर्षांचा व्यवसाय प्रशासन डिग्री आणि सहकारी व्यवसाय व्यवस्थापनाचा ९ महिन्यांचा डिप्लोमा हे अभ्यासक्रम चालवले जातात.

संस्था ६ अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रमही चालवत आहे. यामध्ये कृषी-विपणन आणि सहकारी संस्थांमध्ये मूल्यवर्धन, कृषी उत्पादक संघटनांचे व्यवस्थापन आणि दुग्ध तंत्रज्ञान या विषयांचे २ महिन्यांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहेत. तसेच कृषी उत्पादन आणि भावांचा अंदाज, युवा नेतृत्व आणि सामाजिक बदल आणि सहकारासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र या विषयांचे १ महिन्याचे अभ्यासक्रम आहेत.

या अभ्यासक्रमांमुळे विशेषतः ग्रामीण भागातील युवकांसाठी करिअरचे नवे दालन खुले होत आहे. तरुण, तळागाळातील नेते आणि सहकारी संस्थांच्या व्यवस्थापकांच्या गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमांची रचना केली आहे.

भविष्यातील गरजेनुसार संस्थेने डिजिटल सहकारी संस्था, सहकारी आर्थिक तंत्रज्ञान आणि शाश्वत ग्रामीण उद्योजकता यासारख्या नव्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची अधिकृत मान्यता ही संस्थेसाठी एक परिवर्तनाचा क्षण असून, सहकारी क्षेत्रातील अभ्यासक्रमांसाठी एक मजबूत राष्ट्रीय शैक्षणिक व्यासपीठ तयार होईल.

सहकारातून समृद्धीकडे नेण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल…

पुणे लोकसभा मतदारसंघात गेली अनेक वर्षे सहकार क्षेत्रासाठी कार्यरत असलेली वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था आहे. त्रिभुवन सहकार विद्यापीठाची या संस्थेला देशातील पहिली मान्यता मिळाल्याने आता या सहकार विषयक पूर्ण शैक्षणिक काम व्हॅमनिकॉमला करता येईल. तसेच येथे शिकणाऱ्या सर्वांना अधिकृत विद्यापीठाची पदवी किंवा पदविका किंवा प्रमाणपत्र मिळेल. तसेच या संस्थेत आता सहकार विषयक संशोधनालाही चालना मिळेल. ग्रामीण भागातील युवकांसाठी करिअरचे नवे दालन खुले होईल. त्यामुळे देशातील सहकारापासून समृद्धीकडे नेण्यासाठी हे टाकलेले महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय मंत्री



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24