‘गाड्यांचे शोरूम असतात, तसे परदेशात महिलांचे शोरुम’; चाकणकरांच्या विधानाचा अर्थ काय?


Rupali Chakankar: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्ताने संवेदनशील ते संकल्प या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. गाड्यांचे शोरूम असतात तसे परदेशात महिलांचे शोरुम असतात, असं वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केलं आहे. चाकणकर नेमकं असं का म्हणाल्या? जाणून घेऊयात. 

मानवी तस्करी टाळण्यासाठी आपण मोहिम हाती घेतली आहे. जनजागृती मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे. तस्करीच्या यंत्रणेवर घाव घातला पाहिजे. गेल्या दोन वर्षांत मस्कत, दुबईतून महिलांना परत आणण्यात यशस्वी झालो. 24 महिलांना आपण परदेशातून परत आणलं. गाड्यांचे शोरूम असतात तसे परदेशात महिलांचे शोरुम असतात, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. 

मानवी तस्करीच्या माध्यमातून मिसिंग केसेसची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकवणं, नोकरीच्या जाळ्यात अडकवणं, बाल कामगार, पुरुष देखील मानवी तस्करीत असू शकतो. यासंदर्भात आम्ही मोहिम हाती घेतली आहे, असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. 

कुठे आहे हे पद्धत?

दरम्यान, परदेशातील अनेक देशांमध्ये वेश्या व्यवसाय हा अधिकृत मानला जातो. युरोपमधील अॅमस्टरडॅम तर थायलंडमधील फुकेत येथे एक रस्ता असून तिथे वेश्या व्यवसाय खुलेआम केला जातो. अॅमस्टरडॅम येथे 2010 पासून येथे खुला व्यवसाय म्हणून स्वीकारण्यात आलं आहे. येथील वेश्यांना कायदेशीररित्या कर भरावे लागतात. येथे सुमारे 300 लहान क्युबिकलप्रमाणे खुल्या आहेत. या खोल्यांचा वापर वेश्याव्यवसायासाठी केला जातो. 

ग्राहकांना भुरळ घालण्यासाठी या क्यबुकलला असलेल्या छोट्या खिडकीमागे असतात. त्यानंतर ग्राहकांना जिथे जावेसे वाटेल तिथे त्यांना त्या खिडकीवर ठोठावे लागते. जर या खिडक्यांचे पडदे झाकलेले असतील तर नाही असा अर्थ होतो. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24