आमदार निवासातील कॅन्टीन चालकाला मारहाण केल्याप्रकरणी वादात सापडलेले शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आता माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याशी थेट “लढाई” करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी त्यांनी थेट 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा
.
घटनेची पार्श्वभूमी अशी की, शिळे अन्न दिल्याने संतापून आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल संजय गायकवाड यांच्यावर भडिमार झाला. यावर प्रतिक्रिया देताना एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले होते की, “मी जर त्या कॅन्टीन चालकाच्या जागी असतो, तर गायकवाडांची धुलाई केली असती.” या विधानानंतर संजय गायकवाड यांनीही पलटवार करत ”जलील कॅण्टीन चालक असते तरी त्यालाही चोप दिला असता”, असे म्हटले. त्यावर जलील यांनी “जगह तेरी, दिन तेरा, वक्त भी तेरा, आजा कहा लढना हे ” अशा शैलीत प्रतिआव्हान दिले.
संजय गायकवाडांनी काल जलील यांना दिले होते चॅलेंज
दरम्यान, इम्तियाज जलील यांच्या प्रतिआव्हानानंतर संजय गायकवाड यांनी खुले चॅलेंज दिले होते. इम्तियाज जलील यांनी मला व्यक्तिगत आव्हान दिलेले असल्याने मला यात हिंदू किंवा मुस्लिम धर्माला गोवायचे नाही. पण, त्याला जर एवढी खाजच असेल तर त्याने पोलिस महासंचालकांना एक एफिडेविट करून द्यावं की, आमच्या दोघांच्या वादामध्ये आमच्या दोघांचे काही बरे वाईट झाले तर आम्ही दोघेच जबाबदार राहू. मग मी तुला मुंबईतील आझाद मैदानावर बोलावतो, त्या ठिकाणीच कुणात किती दम आहे हे पोलिसांसमक्ष आपण बघू. आपल्या दोघांच्या मध्ये तिसरा कोणीच येणार नाही, असे खुले चॅलेंज इम्तियाज जलील यांना दिले होते.
बरेवाईट झाल्यास जबाबदारी आमच्या दोघांची
आता याच आव्हानाला संजय गायकवाड यांनी गांभीर्याने घेतले असून स्टॅम्प पेपरवर करारनामा लिहून दिला आहे. ”जलील आणि माझ्या लढाई होईल. यात दगड धोंडे, वा इतर शस्रांचा वापर होणार नाही. आमच्या लढाईत तिसरा येणार नाही, जे काही होईल याची दक्षता पोलिस घेतील. या लढाईत काही बरेवाईट झाल्यास जबाबदारी आमच्या दोघांची राहील. या लढाईची तारीख, वेळ आणि स्थळ जलील यांनी ठरवावे.” असे आमदार संजय गायकवाड यांनी करारनाम्यात लिहून दिले आहे.
इम्तियाज जलील आव्हान स्वीकारणार का?
दरम्यान, दोन नेत्यांमधील शाब्दिक वाद आता थेट लढाईपर्यंत येऊन पोहोचला आहे. आमदार संजय गायकवाड यांनी स्टॅम्प पेपर करारानामा लिहून दिला असून, लढाई करणार असल्याचे ठामपणे ठरवले आहे. आता संजय गायकवाडांच्या या करारानाम्यावर इम्तियाज जलील काय प्रतिक्रिया देतात. ते संजय गायकवाडांचे हे आव्हान स्वीकारतात का? हे पाहावे लागणार आहे.