राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळ कामकाज सुरू असताना रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला असून माणिकराव कोकाटे यांच्या राज
.
कोकाटे यांनी हा विषय संपवला पाहिजे
प्रवीण दरेकर म्हणाले, जी काही घटना घडली ती जनतेला आवडलेली नाही. अशा वेळेला या विषयावर आपली बाजू आणखी ताकदीने मांडण्यापेक्षा दिलगिरी व्यक्त करून जनतेच्या भावनांचा आदर केला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत समर्पक अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारची गोष्ट निश्चितच भूषणावह नाही. कारण विधिमंडळाच्या सभागृहात कामकाज करत असताना त्याचे गांभीर्य असणे हे त्यांनी अधोरेखित केले आहे. माणिकराव कोकाटे यांनी हा विषय संपवला पाहिजे, त्याचे तुष्टीकरण करण्याची अवश्यता नाही.
प्रवीण दरेकरांचा माणिकराव कोकाटेंना मैत्रीचा सल्ला
पुढे प्रवीण दरेकर म्हणाले, मीडिया पण काही चुकीचे दाखवत नाही. स्वयंस्पष्ट चित्र दिसत आहे, त्यामुळे मीडियात सुद्धा त्यांनी काही जाणीवपूर्वक केले असे समजून मीडियाला दोष देण्यात अर्थ आहे असे मला वाटत नाही. यात आत्मविश्वास असण्याची आवश्यकता नाही, कारण निश्चितच ते राज्यातले ते सिनियर आमदार आहेत. पण, मीच केलेले योग्य आहे असे काही सांगण्याचा खटाटोप करण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही. त्यांनी विनाकारण विषय वाढू नये, असा माझा त्यांना मित्रत्वाचा सल्ला आहे.
माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यामुळे सरकारवर विरोधक दबाव टाकत आहेत का? असा प्रश्न त्यांना विचारला असता प्रवीण दरेकर म्हणाले, विरोधकांचे कामच दबाव टाकण्याचे असते. सत्ताधारी पक्षाचे एखादे कृत्य दिसले की त्याचा इश्यू विरोधक करतच असतात. पण आपणच एक प्रकारे विरोधकांना विरोध करण्यासाठी हत्यार देत असतो, अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली आहे.