भुमरेंचा करोडपती ड्रायव्हर आयकरच्या रडारवर, ड्रायव्हरला ITची नोटीस


विशाल करोळे, झी 24 तास संभाजी नगर : संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांच्या चालकाला आयकर विभागाची नोटीस आली आहे.  नवाबच्या सालारजंग कडून त्याला शहरातील दीडशे कोटीची एक जमीन हिबानामा म्हणजे गिफ्ट मिळाल्याच्या प्रकरणात ही नोटीस आल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे भुमरेंचा ड्रायव्हर जावेद शेख अडचणीत आला आहे. एकीकडे ड्रायव्हरच्या नावाने भुमरेंच्या जमीन हडपल्याचा आरोप होतो…

 छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदीपान भुमरेंचा चालक जावेद शेखला आयकर विभागाने नोटीस बजावलीय… जमीन हिबानामा प्रकरणात जावेद शेख आयकर विभागाच्या रडारवर आलाय… जावेद याला 3 जुलै रोजी आयकर विभागाने संपत्ती बाबत खुलासा करण्याची नोटीस बजावली.. इतकंच नाही तर 8 जुलैला याबाबत स्पष्टिकरण देण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले होते.. याबाबत जावेद याने तारीख वाढवून घेऊन खुलासा करण्यास मुदत वाढवून मगितल्याची  महिती मिळतेय… त्यामुळं ही जमीन हिबानामा असली तरी त्यावर जो कर भरावा लागेल त्याबाबत ही नोटीस असल्याचं सांगण्यात येतेय…

का भरावा लागेल कर? काय आहे नियम? 

जमीन/  इमारत अनोळखी व्यक्तीकडून भेट मिळाल्यास भारतीय प्राप्तिकर कायद्यानुसार कर भरावा लागतो
स्टॅम्प ड्युटीची व्हॅल्यू 50 हजारापेक्षा कमी असल्यास कर लागू होत नाही
स्टॅम्प ड्युटीची व्हॅल्यू 50 हजारापेक्षा जास्त असल्यास पूर्ण स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यूवर कर लागू होतो
हे उत्पन्न इतर स्त्रोतांतून उत्पन्न म्हणून समजलं जातं
नात्यात नसलेल्या व्यक्तीकडून मालमत्ता भेट मिळाल्यास कर लागतो
नातेवाईकांकडून भेट मिळाल्यास मालमत्ता करात माफी

तर या प्रकरमात खासदार भुमरे यांनी ड्रायव्हर जावेद शेखला बळीचा बकरा बनवल्याचा आरोप एमआयएमचे नेते इम्तियाज जलिल यांनी केलाय.. त्यामुळे केवळ ड्रायव्हरला नोटीस देऊन भागणार नाही तर ज्यांनी ज्यांनी या प्रकरणात मदती केलीय. त्या सर्वांची चौकशी करण्याची मागमी जलील यांनी केली आहे. वकिल मुजाहिद खान यांनी पहिल्यांदा हे प्रकरण उजेडात आणलं होतं. तेव्हा त्यांनी दिडशे कोटींची अडिच एकर जमिन हडपल्याचा भुमरेंवर आरोप केला होता. मात्र आता त्यात भर पडली आहे. 

जमिनीचं प्रकरण काय?

विलास भुमरेंचे ड्रायव्हर जावेद शेख रसूल यांच्या नावावर 150 कोटींची जमीन आहे. ड्रायव्हरच्या नावावर असलेली जमीन ही हैदराबादच्या सालारजंग कुटुंबाची असल्याची, त्यांच्या नातेवाईकांनी दावा केला आहे. ही जमीन ऍड मुजाहिद खान यांना कायदेशीर कचाट्यातून सोडवण्यासाठी दिली होती. याच प्रकरणात जलिल यांचे संदीपान भुमरे, विलास भुमरेंवर आरोप केला असून हडपलेली जमीन अडीच एकर नसून साडेआठ एकर, जलिल यांचा आरोप आहे. जमिनीची किंमत तब्बल 500 कोटी, जलिल यांचा दावा ‘पार्टनरला जमीन द्यायची असल्याने अडीच एकराचा वेगळा हिबानामा पुढे आणला. ड्रायव्हर जावेदचं नाव पुढं करून ही जमीन संदीपान भुमरे, विलास भुमरे यांनी बळकावल्याचा आरोप केला आहे.

जमीन हिबानामा प्रकरणात संदीपान भुमरेंचा ड्रायव्हर आता आयकर विभागाच्या रडारवर आलाय़.. त्यामुळे आता या कोट्यवधींच्या जमीनीच्या हिबानामा प्रकरणात ड्रायव्हर तर अडचणीत आलाच आहे. मात्र यामुळे भुमरे पिता-पुत्रांच्या अडचणीही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24