महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैगिक अत्याचार करून ती गर्भवती राहिल्यानंतर तिच्या न कळतच तिच्या आवडत्या खाण्याच्या पदार्थामध्ये गर्भपाताचे औषध मिसळून तिचा गर्भपात घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाला खडकी पोलिसांनी बेड्
.
लैगिंक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल
तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विकास बापु शिंदे (रा. कात्रज) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २५ वर्षीय तरूणीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०२३ ते १५ जुलै २०२५ दरम्यान घडला. तरूणीने तिच्या तक्रारीत आरोपीने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले आहे.
बस प्रवासात सोन्याची पाटली चोरली
स्वारगेट ते कोथरूड असा पीएमपीएलने प्रवास करणार्या महिलेची सोन्याची ३५ हजारांची पाटली गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी चोरी करून नेली. स्वारगेट परिसरात आल्यावर आपली पाटली चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत सरोज मधुकर वाडेकर (५२, रा. साई आंगण सोसायटी, गुरूवार पेठ, पुणे ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्वारगेट पोलिस करत आहेत.