संजय गायकवाड यांचे पुन्हा वादग्रस्त विधान: तू अन् मी एकटेच आझाद मैदानात भेटू, इम्तियाज जलील यांना दिले खुले चॅलेंज – Buldhana News



मुंबईतील आमदार निवासातील कँटीन चालकास मारहाण केल्याप्रकरणी चर्चेत आलेले, आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरणारे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान करून नवीन वाद ओढवून घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच हॉटेलमध्ये वेट

.

संजय गायकवाड यांनी जाहीरपणे म्हटले की, मुंबईतील आझाद मैदानात तू आणि मी एकटे भेटू. तिसरा कोणी मध्ये येणार नाही. हे चॅलेंज देत त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या तीन दिवसांपूर्वीच गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद न ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यांनी त्यांचा शब्द फिरवल्याचे दिसत आहे. त्यांनी दिलेल्या या आव्हानाला इम्तियाज जलील काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एमआयएम नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील हे रविवारी बुलढाणा दौऱ्यावर होते. त्यांनी बुलढाणा, मोताळा, मलकापूर आणि नांदुरा येथे कॉर्नर सभा घेतल्या. या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, मी कुणाच्याही आव्हानाला उत्तर देण्यासाठी आलो नाही. मी येथे माझ्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आलो आहे.

मात्र, आमदार संजय गायकवाड यांनी यावर प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा इम्तियाज जलील यांना थेट आव्हान दिले आहे. त्यांनी म्हटले, पोलिसांनी विनंती केली म्हणून त्याला बुलढाण्यात पाय ठेवता आला. जर मला त्याच्याविषयी द्वेष असता, तर मी त्याला मराठवाड्याची सीमा पार करू दिली नसती.

नेमके काय म्हणाले संजय गायकवाड?

इम्तियाज जलील यांनी मला व्यक्तिगत आव्हान दिलेलं असल्याने मला यात हिंदू किंवा मुस्लिम धर्माला गोवायचं नाही. पण, त्याला जर एवढी खाजच असेल तर त्याने पोलीस महासंचालकांना एक एफिडेविट करून द्याव की, आमच्या दोघांच्या वादामध्ये आमच्या दोघांचं काही बरं वाईट झालं तर आम्ही दोघेच जबाबदार राहू. मग मी तुला मुंबईतील आझाद मैदानावर बोलवतो, त्या ठिकाणीच कुणात किती दम आहे हे पोलिसांसमक्ष आपण बघू. आपल्या दोघांच्या मध्ये तिसरा कोणीच येणार नाही, असे खुले चॅलेंजच त्यांनी दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24