साताऱ्यात सोमवारी दुपारी घडलेली एक धक्कादायक घटना सध्या शहरभर चर्चेचा विषय ठरत आहे. एका युवकाने अल्पवयीन शाळकरी मुलीला ताब्यात घेत तिच्या गळ्यावर चाकू लावत तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र घटनास्थळी जमलेल्या नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे आणि पो
.
यासंबंधीच्या मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित माथेफिरू युवकाचे या अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होते. याआधीही त्याच्याकडून तिला त्रास दिला जात होता, अशी माहिती मिळते. सोमवारी ती मुलगी बसप्पा पेठेतील करंजे परिसरात आली असता, अचानक हा तरुण त्या मुलीसमोर गेला, तिला जबरदस्तीने ताब्यात घेतले आणि तिच्या गळ्याला चाकू लावत धमकावू लागला. या प्रसंगामुळे आसपासच्या परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
जमावाच्या प्रसंगावधानाने वाचला मुलीचा जीव
यावेळी जमलेल्या नागरिकांनी युवकाला मुलीला सोडण्याची विनंती केली, मात्र तो काही केल्या ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. उलट तो उपस्थित लोकांना घटनास्थळावरून निघून जाण्यास सांगत होता. त्या वेळी काही तरुणांनी शिताफीने योजना आखली. एकजण मागच्या कंपाउंडवरून आत घुसला आणि युवकाच्या पाठीमागून त्याला घट्ट पकडले, तर समोरून आलेल्या इतरांनी तातडीने झडप घालून त्याच्या हातातील चाकू हिसकावून घेतला. त्यानंतर जमावाने त्या माथेफिरू युवकाची चांगलीच धुलाई केली.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल
सातारा शहर पोलिस ठाण्यातील गोपनीय अंमलदार सागर निकम, धीरज मोरे आणि धाडसी नागरिक उमेश आडागळे (रा. दिव्य नगरी) तसेच अमोल इंगवले (रा. करंजे) यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मुलीला सुरक्षितरीत्या त्या युवकाच्या तावडीतून सोडवले. सध्या या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
तरुणाची पोलिसांकडून चौकशी सुरू
संबंधित युवकाला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या कृतीमागणी संबंधित पार्श्वभूमी, युवकाची मानसिक स्थिती आणि या घटनेमागील उद्देश यासंदर्भात अधिक चौकशी सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अशा प्रकारच्या संशयास्पद वर्तनाबाबत त्वरित माहिती देण्याचेही आवाहन केले आहे.