विधिमंडळाच्या सभागृहात प्रश्नोत्तरांचा तास सुरू असतानाच राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाइलवर ‘जंगली रमी’ हा ऑनलाईन जुगार खेळताना आढळल्याच्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांन
.
आमदार रोहित पवार यांनी काल कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळाच्या सभागृहात पत्ते खेळतानाचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर विरोधकांकडून माणिकराव कोकाटे आणि महायुती सरकारवर टीका करण्यात सुरुवात केली होती. चौफेर टीका सुरू झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी मी युट्युब बघत होतो आणि रमीची जाहिरात स्किप करत होतो, असे स्पष्टीकरण दिले. मात्र, आता जितेंद्र आव्हाड यांनी थेट दोन नवे व्हिडीओ सादर करून यामध्ये कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे, हे दिसेल, असा दावा करत कोकाटेंच्या स्पष्टीकरणावर पाणी फेरले आहे.
नेमके काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
एकीकडे विधिमंडळाचे कामकाज सुरू आहे; प्रश्नौत्तरांचा तास सुरू आहे अन् दुसरीकडे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत होते. त्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर, माणिकराव कोकाटे यांच्या पहिल्या व्हिडिओत ते जंगली रमी खेळतच नव्हते जाहिरात बघत होते असे सांगण्यात येत होते. आता मी दोन व्हिडिओ देतोय. दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा… कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे, हे दिसेल, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
माणिकराव कोकाटे हेच ऑनलाईन जुगाराचे पत्ते आपल्या बोटाने सरकवत आहेत. आणखी किती पुरावे हवेत ते सांगा; मागाल तेवढे पुरावे देतो, असे आव्हानही आव्हाड यांनी दिले आहे. महाराष्ट्राचाच जुगाराचा डाव करून टाकलाय…! असे म्हणत आव्हाड यांनी संताप व्यक्त केला.
मंत्र्यांचे व्हिडिओ सरकारसाठी डोकेदुखी
महायुती सरकारमधील मंत्री आणि आमदारांचे वादग्रस्त व्हिडिओ सातत्याने समोर येत असल्यामुळे सरकार अडचणीत येत असल्याची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते बनियान मध्ये असून त्याच्या खोलीत रोख रक्कम भरलेली बॅग दिसत होती. त्याआधी आमदार संजय गायकवाड यांचा कॅन्टीन चालकाला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला होता.आता कृषी मंत्रीच मोबाइलवर रमी खेळताना दिसत असल्याने, सरकारमधील शिस्त आणि जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हे ही वाचा…
रमीत रमणाऱ्या कृषीमंत्र्याला घरी पाठवा:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची मागणी; सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात हनीट्रॅपचा फास अडकल्याचा दावा
काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रमीत रमणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. राज्यात दररोज 6 शेतकरी आत्महत्य करत असताना राज्याचा कृषिमंत्री विधिमंडळात बसून ऑनलाईन रमी खेळतो. हे चित्र महाराष्ट्राची लाज वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे, असे ते म्हणालेत. सविस्तर वाचा…