शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक: पुण्यात दोन वेगळ्या घटनांमध्ये 1.11 कोटींची फसवणूक; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल – Pune News



शेअर बाजारात गुंतवणुक करण्याच्या आमिषाने फसवणुक करण्याच्या घटना सातत्याने वाढत आहे. अशाच प्रकारे सायबर चोरट्यांनी गुंतवणुकीच्या आमिषाने एक कोटी ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अनोळखी सायबर चोरट्यांविरुद्ध सायबर पोलीस ठाणे

.

लाेणी काळभोर भागातील एकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८८ लाख ३४ हजारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ४७ वर्षीय तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार लोणी काळभोर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर फेब्रुवारी महिन्यात मेसेज पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. रकम गुंतविल्यानंतर त्यांना सुरुवातीला परतावा देण्यात आला. त्यानंतर तक्रारदाराने चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी रकम गुंतविली. रकम गुंतविल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही, तसेच परतावाही देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक एस निकम तपास करत आहेत.

दुसऱ्या एका घटनेत कोथरूड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २२ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चाेरट्यांविरुद्ध फसणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करत आहेत. |



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24