आळंदीत वारकरी कीर्तनकार परिषदेत एकमत: संतांचे विचार समाजाला जोडण्यासाठी महत्त्वाचे, तज्ज्ञांचा सूर – Pune News



विखुरलेल्या समाजाला चालना देण्यासाठी संताचे विचार अत्यंत महत्वाचे आहे. या समाजाला जोडण्याचे कार्य केवळ वारकरी संप्रदायाने केले आहे.हा संप्रदाय म्हणजे समन्वयाचे स्त्रोत आहे. संतत्व म्हणजे मातृत्व असून हेच समाजाला जोडून ठेवतात असा सूर परिषदेत सहभागी सर

.

‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ एज्युकेशन, पुणे’ व ‘एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसद’ यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमानवाडी आळंदी (देवाची) येथील डॉ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस स्कूल येथे आयोजित दोन दिवसीय ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे’चे तिसरे सत्र‘वारकरी संप्रदायाच्या सामाजिक प्रबोधनाची लोककल्याणकारी वाटचाल’याविषयावर संपन्न झाले. यासत्रात हा सूर निघाला.

प्रसंगी पंढरपुर येथील वै.हभप श्रीगुरू अप्पासाहेब वासकर महाराज फड चे प्रमुख हभप देवव्रत (राणा) महाराज वासकर,आळंदी येथील हभप डॉ. नारायण महाराज जाधव, श्रीवरद विनायक संस्थानचे प्रमुख हभप उध्दव महाराज मंडलिक,पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे प्रा. हभप डॉ. दिनेश रसाळ, सामाजिक उद्योजक व आरएफआयडी-एनएफसी तंत्रज्ञानाचे प्रणेते असीम पाटील आणि संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व अर्थव्यवहार विश्लेषक अभय टिळक हे उपस्थित होते.

अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ.राहुल कराड होते. तसेच संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांची विशेष उपस्थिती होती. तसेच, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, पद्मश्री पोपटराव पाटील व परिषदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील उपस्थित होते.

दिनेश रसाळ म्हणाले,जगाचे कल्याण हे केवळ संतांच्या विचारातच आहे. त्यामुळे साधु संतांच्या समतेचा विचार समाजाता रुजवावा. यांंनी समाजात माणुसकीचा संदेश दिला आहे. वसुधैव कुटुम्बकमची भावना ठेवणारे संत यांच्या आचरणांमुळेच समाजाची घडी व्यवस्थित बसली आहे. समाजाला सुखी ठेवण्यासाठी सर्वांनी द्वेष वृत्ती संपवावी.

हभप देवव्रत (राणा) महाराज वासकर म्हणाले,वर्तमान काळात वारकरी संप्रदायावर होणार्‍या अतिक्रमणाला आळा घालणे आवश्यक आहे. येणार्‍या काळात शैक्षणिक क्षेत्रात वारकरी अभ्यासक्रमाचा समावेश करणे गरजेचा आहे.

उद्धव महाराज मंडलिक म्हणाले,आधुनिक काळात वारकरी संप्रदायाला संकुचित होऊन चालणार नाही. विश्व कल्याणाचा विचार करता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून संतांचे, कीर्तनकारांचे विचार सर्वदूर पसरवावे. वारकरी समाजाने समाजाला जोडण्याचे काम करीत आहेत. विखूरलेल्या या समाजाला एकत्रित जोडण्याचे कार्य आणि बळ केवळ वारकरी संप्रदायातच आहे. समाज प्रबोधनाचे कार्य वारकरी संप्रदाय करीत आहे. वारीमध्ये चालणार्‍या प्रत्येक वारकर्‍याला त्याच्या मनातील सर्व प्रश्नांचे उत्तर मिळतात. शुद्ध व शाकाहरी भोजनामुळे व्यक्तीच्या विचार सरणीत खूप मोठा बदल घडतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24