राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात बसून मोबाईलवर रमी गेम खेळताना दिसत असलेला एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर हा व्हिडीओ शेअर केल्यापासून विरोधक
.
प्रताप सरनाईक यांनी कोकाटेंच्या रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, त्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “त्याबद्दल मला काही माहिती नाही. सध्या सगळेच रमी खेळतात. आमिर खान, सलमान खान हे देखील खेळतात. चांगला खेळ म्हणून टीव्हीवालेही हे सतत दाखवत असतात.”
रोहित पवारांकडून व्हिडिओ पोस्ट
रोहित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये कृषिमंत्री मोबाईलवर रमी खेळत असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. या व्हिडीओसह सरकारवर सडकून टीका करत म्हणाले, “राज्यात रोज सरासरी आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत. पिकविमा, कर्जमाफी, भावांतर या महत्त्वाच्या प्रश्नांवर काहीच हालचाल नाही. त्यामुळं असं वाटतं की कृषिमंत्र्यांकडे काहीही काम उरलं नसल्यामुळे त्यांना रमी खेळण्याची वेळ येते. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला कधी शेतकऱ्यांच्या ‘कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज’ या आर्त आवाजाची जाणीव होईल का?” असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
जितेंद्र आव्हाडांकडून कोकाटेंना रम्मी मास्तर उपमा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रमी खेळतानाच्या व्हिडिओवरून माणिकराव कोकाटे यांचा समाचार घेतला. जितेंद्र आव्हाड यांनी माणिकराव कोकाटेंचा रम्मीमास्तर असा उल्लेख करत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला ‘शेतकऱ्यांनो विसरा हमी …खेळा रम्मी…’असे कॅप्शन दिले आहे.
हे ही वाचा…
रम्मी खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्या!:शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारला दिसत नाहीत, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात
शेतकरी मरतोय आणि कृषिमंत्री रम्मी खेळतोय काय आनंदी आनंद आहे. जनतेच्या बोकांडी नतद्रष्ट सरकार बसले असून महाराष्ट्राच्या इतिहासात असे सरकार पुन्हा होणार नाही.यांना कुणाची परवा नाही, असे म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माणिकराव कोकाटे यांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. पूर्ण बातमी वाचा…